health tips : झोपेमुळे मणक्यात अन् मानेत दुखत असेल तर काय करावे? जाणून घ्या, ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आजकाल, धावपळीच्या या आयुष्यात, आपल्याला मऊ गाद्या असलेले बेड आवडतात. ते चांगली झोप आणि विश्रांती देतात. मात्र, हे मऊ आणि जाड गाद्या मान, कंबर आणि पाठदुखीचे कारण आहेत.
सोनिया मिश्रा, प्रतिनिधी
रुद्रप्रयाग : पूर्वी मऊ गाद्या असलेल्या बेडचा वापर शहरांपुरता मर्यादित होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आता ग्रामीण भागातही त्याचा अधिक वापर केला जातो. व्यावसायिकांनी उत्कृष्ट मार्केटिंग गेल्यामुळे, हे आरामदायी बेड ग्रामीण भागातही पाहायला मिळतात.
दरम्यान, पर्वत, डोंगर, ग्रामीण भागात गवत, लाकूड आणण्यासारखी शेतीची कामे केली जातात. उत्तराखंडमधील पहाडी जिल्ह्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अवजड कामांची जबाबदारी असते. यासाठी महिलांच्या मानेत तसेच पाठीत वेदना जाणवतात. यासोबतच आपण पाहतो की आजकाल अनेकांना कोणत्या ना कोणत्या वेदनांनी त्रस्त आहे. त्यामुळे याचे खरे कारण म्हणजे आपली झोपण्याची पद्धत हे आहे.
advertisement
आजकाल, धावपळीच्या या आयुष्यात, आपल्याला मऊ गाद्या असलेले बेड आवडतात. ते चांगली झोप आणि विश्रांती देतात. मात्र, हे मऊ आणि जाड गाद्या मान, कंबर आणि पाठदुखीचे कारण आहेत. म्हणून, आपण नेहमी योग्य गादी निवडली पाहिजे. जे लोक जास्त शारीरिक हालचाली करतात विशेष करुन त्यांनी याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
advertisement
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनोज बडोनी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत त्यांनी सांगितले की, पहाडी परिसरात खेड्यातील महिला खूप मेहनती आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनात, त्या लाकूड, चारा, शेतीचे साहित्य इत्यादी खूप जड वस्तू उचलतात आणि रात्री जेव्हा त्या थकतात तेव्हा त्यांना आरामदायी गादीवर झोपायला आवडते. मात्र, हे त्यांच्या शरीरासाठी योग्य नाही.
advertisement
त्यांनी सांगितले की, केवळ महिलांनीच नाही तर प्रत्येकाने हार्ड बेडचा म्हणजेच गाद्या वापरल्या पाहिजेत. जर ते कापसाच्या गादीवर झोपत असतील तर त्यांनी खाट वापरावी. खाट ही पाठीच्या हाडांसाठी खूप चांगली मानली जाते. बाजारात मिळणाऱ्या गाद्यांमध्ये फोम साईडऐवजी हार्ड साइडचा वापर करावा. याशिवाय वाढत्या वयाबरोबर खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि दूध प्यावे, असाही सल्ला त्यांनी दिला.
advertisement
सूचना - ही बातमी तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Rudraprayag,Uttarakhand
First Published :
February 17, 2024 5:19 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
health tips : झोपेमुळे मणक्यात अन् मानेत दुखत असेल तर काय करावे? जाणून घ्या, ही महत्त्वाची माहिती