बिहारसह १० राज्यांमधील ३७ राज्यसभेच्या जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. बिहारच्या पाच जागांसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. ३ आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असल्याने, नामांकन दाखल करण्यासाठी फक्त ५ मार्च शिल्लक आहे. राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. बिहारमधून पक्षाने दोन जणांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे. नितीन नबीन आणि शिवेश कुमार यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
advertisement
कुणाला कुठून संधी?
-आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-छत्तीसगडमधून भाजपचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून लक्ष्मी वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-हरियाणामधून संजय भाटिया यांना पक्षाचे राज्यसभेचे उमेदवारी दिली आहे.
-भाजपने ओडिशामधून दोन नावे जाहीर केली आहेत. प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवले आहे
-पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जागांसाठी कुणाचेही नाव जाहीर नाही
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील कुणाचेही नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे राज्यातील सहा जागांवर कुणाला संधी मिळणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
