भोपाल : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात एक आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये यजमानाच्या भूमिकेत असणार आहेत. संपूर्ण भारतातीलच नव्हे तर जगभरातील रामभक्तांमध्ये एक अभूतपूर्व असा उत्साह पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे.
अयोध्येतील 22 जानेवारीला होणाऱ्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने एका दुकानदाराने एक अनोखी ऑफ सुरू केली आहे. 22 जानेवारीला जो कुणी जय श्रीराम बोलेल त्याला फ्रीमध्ये हवे तितक्या पाणीपुरी खायला मिळतील. मध्यप्रदेशातील भोपाळमधील करोंद येथील संजय स्वीट्स वर ही ऑफर देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर याठिकाणी ‘पाणीपुरी फेस्टिवल’सुद्धा सुरू आहे. यामुळे याठिकाणी दररोज पाणीपुरी खाण्याचे रेकॉर्ड मोडले जात आहेत.
advertisement
आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10 लाख रुपयांच्या नोकरीवर पाणी! शेतकऱ्याचा मुलानं आता केली कमाल
संजय स्वीट्सचे मालक संदीप साहू यांनी सांगितले की, येत्या 22 जानेवारीला जो कुणी व्यक्ती दुकानावर येऊन जय श्रीराम बोलेन, त्याला फ्रीमध्ये अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ घातली जाईल. याशिवाय, इतर दिवशी तुम्ही येथे 20 रुपयांचे टोकन घेऊन अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकता. येथे अनेक लोक विक्रम करत आहेत. काही लोक 100 पाणीपुरी खातात तर काही 200 पाणीपुरी आरामात खातात.
पुढे ते म्हणाले की, याठिकाणी मिनरल वॉटरपासून चिंचेचे पाणी बनवले गेले आहे. याठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी मोठी गर्दी होत आहेत. रोज जवळपास 40 हजार पाणीपुरीची विक्री होत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पाणीपुरी फेस्टवल सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत आहे. 20 रुपयांचे कूपन घेऊन तुम्हीही इतर दिवशी हवी तेवढ्या पाणीपुरी खाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.