TRENDING:

Shashi Tharoor Health Update: काल पडले, सकाळी ट्विट केलं नंतर डॉक्टरांच्या चेकअपमध्ये भलतंच निघालं

Last Updated:

शशी थरुर यांना सावरेपर्यंत पायाला दुखापत झाली होती. पाय दुखत होती, वेदना जाणवायला लागल्या होत्या. त्यांचा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फोनची रिंग वाजली आणि उचलून फोनवर बोलता बोलता संसदेच्या पायऱ्यांवरुन अचानक शशी थरुर यांचा तोल गेला. ते झटकन खाली कोसळले. एक क्षण काय झालं ते त्यांनाही समजलं नाही. तिथे अखिलेश यादव सोबत होते. त्यांनी शशी थरुर यांना सावरलं. काय झालं.... प्रश्न केला. शशी थरुर यांना सावरेपर्यंत पायाला दुखापत झाली होती. पाय दुखत होती, वेदना जाणवायला लागल्या होत्या. त्यांचा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
News18
News18
advertisement

या व्हिडीओवर स्वत: शशी थरुर यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यासोबत त्यांच्या प्रकृतीची अपडेटही दिली आहे. काल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना ज्यांनी ज्यांनी सावरलं त्या सगळ्यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत. संसदेच्या पायऱ्या उतरताना एक पायरी चुकल्यामुळे मी थोडासा पडलो. अजूनही थोडं दुखत आहे, पण मला वाटत नाही की काही फ्रॅक्चर झालं आहे, फक्त घोट्याला मुरगळले आहे आणि काही बोटांना मार लागला आहे.

advertisement

आशा आहे की दोन दिवसांत ठीक होईल. मी माझ्या घरातील ऑफिसमध्ये एका स्टूलवर पाय ठेवून दुपारी ४ ते संध्याकाळी ७:३० पर्यंत (दोन राजदूतांसह) अनेक बैठका घेतल्या. फ्रॅक्चर नाही याची खात्री करण्यासाठी उद्या एक्स-रे करून घेईन. काही ठिकाणी दुखत आहे, त्यात माझ्या दुखावलेल्या अहंकाराचाही समावेश आहे, असं त्यांनी बुधवारी रात्री उशिरा ट्विट करून माहिती दिली.

advertisement

शशी थरुर जेव्हा सकाळी एक्स रे करुन आले तेव्हा मात्र जे ते काल बोलले होते तो सगळा त्यांचा भ्रम होता. एक्स रे मधून मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं समोर आलं. आज सकाळी केलेल्या एक्स-रेनंतर, डॉ. शशी थरूर यांच्या दुखापतीचे स्वरूप फ्रॅक्चर असल्याचे निश्चित झाले आहे. मनःस्थिती चांगली आहे आणि ते शक्य असेल त्याप्रमाणे संसदीय कामकाज व इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत राहतील अशी माहिती देखील दिली आहे. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने प्लॅस्टर करण्यात आलं आहे. त्यांनी स्वत: फोटो शेअर करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

दुसरीकडे शशी थरुर यांच्या मुलाचा कॉस्ट कटिंगदरम्यान अमेरिकेत जॉब गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या मुलाला ईशान थरूर यांना काल तडकाफडकी नोकरीवरुन काढण्यात आलं.याबाबतची माहिती मुलाने ट्विट करून दिली आहे.

मराठी बातम्या/देश/
Shashi Tharoor Health Update: काल पडले, सकाळी ट्विट केलं नंतर डॉक्टरांच्या चेकअपमध्ये भलतंच निघालं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल