TRENDING:

उद्यापासून येऊ नका! शशी थरूर यांच्या मुलाला टॉप कंपनीतून नारळ, कॉस्ट कटिंगचा मोठा फटका

Last Updated:

जागतिक कॉस्ट कटिंगमुळे शशी थरूर यांच्या मुलगा ईशान थरूर यांची वाशिंग्टन पोस्टमधून नोकरी गेली. शशी थरूर संसदेच्या पायऱ्यांवरून घसरले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जागतिक मार्केटमध्ये सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. सगळीकडे कॉस्ट कटिंग सुरू झालं आहे. त्यामुळे नोकऱ्या जात आहेत शिवाय नवीन नोकरी लवकर मिळत नसल्याने दबाव आहे. सर्वसामान्य लोकच काय तर नेत्यांची मुलंही या कॉस्ट कटिंगचे बळी होताना पाहायला मिळाले. शशी थरूर यांच्या मुलाला अचानक उद्यापासून तुम्ही येऊ नका असं सांगण्यात आलं. कॉस्ट कटिंगचा फटका त्याला बसला आणि त्याची नोकरी गेली. त्याने ट्विटरवर आपल्या ऑफिसमधला एक फोटो शेअर करून वाईट दिवस असं कॅप्शन दिलं आहे.
News18
News18
advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्यासाठी बुधवार, ४ फेब्रुवारीचा दिवस असाच काहीसा 'बॅड डे' ठरला. एका बाजूला संसदेच्या पायऱ्यांवर त्यांचा पाय घसरला आणि तोल गेला तर काही तासांनंतर सातासमुद्रापार अमेरिकेतून त्यांच्या मुलाच्या नोकरीबाबत चिंताजनक बातमी आली. यामुळे शशी थरुर यांचं टेन्शन वाढलं आहे.

बुधवारी दिवसाची सुरुवातच थराराने झाली. शशी थरूर संसदेच्या पायऱ्यांवर फोनवर बोलत उभे असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. तिथेच उभे असलेले सपा नेते अखिलेश यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता थरूर यांना सावरलं आणि उठवून उभं केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या धक्क्यातून सावरल्यानंतर थरूर यांनी एक सूचक ट्विट केलं. "जिस दीये को, तूफां में जलना होगा... उसे संभल-संभल के चलना होगा." त्यांना कल्पनाही नसेल की पुढच्या काही तासांत घरून आणखी एक मोठं वादळ येणार आहे.

advertisement

थरूर या अपघातातून सावरत असतानाच, त्यांचे चिरंजीव ईशान थरूर यांच्याबद्दल दुःखद बातमी आली. जगातील नामवंत वृत्तसंस्था असलेल्या 'वाशिंग्टन पोस्ट'ने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. दुर्दैवाने यामध्ये ईशान थरूर यांचाही समावेश आहे. गेल्या १२ वर्षांपासून ईशान तिथे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे रिपोर्टिंग करत होते. ईशान यांनी सोशल मीडियावर आपल्या रिकाम्या ऑफिसचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "आजचा दिवस खूप वाईट आहे. मला वाशिंग्टन पोस्टमधून काढण्यात आलं आहे." त्यांच्या या पोस्टमध्ये केवळ नोकरी गेल्याचं दुःख नव्हतं, तर १२ वर्षांच्या सहकाऱ्यांपासून दुरावल्याची वेदना स्पष्टपणे जाणवत होती.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

एका बाजूला वडील संसदेच्या पायऱ्यांवरून घसरले आणि दुसऱ्या बाजूला मुलाची करिअरमधील 'पायरी' डळमळीत झाली. शशी थरूर यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वासाठी आपल्या मुलाचं हे दुःख पाहणं नक्कीच सोपं नसेल. ईशान यांच्या पोस्टवर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ईशान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, "या प्रतिभावान पत्रकारांसोबत काम करणं हा माझा सन्मान होता, आज त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय."

advertisement

मराठी बातम्या/देश/
उद्यापासून येऊ नका! शशी थरूर यांच्या मुलाला टॉप कंपनीतून नारळ, कॉस्ट कटिंगचा मोठा फटका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल