TRENDING:

क्रौर्य कळस, प्रकार पाहून शहर सुन्न; मुलांच्या डोळ्यांसमोरच पत्नीला पेटवले, आईला वाचवायला गेलेली मुलगीही आगीत

Last Updated:

Shocking Incident: हैदराबादमध्ये संशयातून पतीने पत्नीला त्यांच्या लहान मुलांसमोरच जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ख्रिसमसच्या एक दिवस आधी घडलेल्या या अमानुष प्रकाराने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

हैदराबाद: हैदराबादमध्ये पतीने पत्नीला त्यांच्या लहान मुलांसमोरच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली असून, या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

ही भीषण घटना 24 डिसेंबर रोजी म्हणजेच ख्रिसमसच्या एक दिवस आधी तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील नल्लाकुंटा परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपीचे नाव वेंकटेश असे असून तो पत्नी त्रिवेणीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होता. वेंकटेशकडून घरात त्रिवेणीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता.

advertisement

घटनेच्या दिवशी वेंकटेशने पत्नी त्रिवेणीला त्यांच्या दोन (मुलगा आणि मुलगी) मुलांच्या समोरच मारहाण केली. ही हिंसा इतक्यावरच थांबली नाही, तर काही वेळातच ती प्राणघातक वळणावर गेली. वेंकटेशने घरातच त्रिवेणीवर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे.

आईला वाचवण्यासाठी त्यांची मुलगी धावून गेली असता, आरोपीने तिलाही आगीत ढकलल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने मुलगी थोडक्यात बचावली असून तिला किरकोळ जखमा झाल्या. मुलांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत घराकडे आले. दरम्यान गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्रिवेणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर जखमी मुलीला देखील तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी वेंकटेश घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि तो अद्याप फरार आहे.

advertisement

माहितीनुसार वेंकटेश आणि त्रिवेणी यांचा प्रेमविवाह झाला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, वेंकटेशच्या वाढत्या संशयामुळे त्रिवेणीवर सातत्याने अत्याचार करत होता. याच कारणामुळे काही काळापूर्वी त्रिवेणी आपल्या माहेरी जाऊन राहिली होती. मात्र पतीने आपली वागणूक सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती पुन्हा सासरी परतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

या घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी वेंकटेशचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
क्रौर्य कळस, प्रकार पाहून शहर सुन्न; मुलांच्या डोळ्यांसमोरच पत्नीला पेटवले, आईला वाचवायला गेलेली मुलगीही आगीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल