केरन आणि त्रालमध्ये ऑपरेशन, सहा दहशतवादी ठार
काश्मीरचे आयजीपी व्ही.के. बिरदी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "केरन आणि त्राल परिसरात दोन स्वतंत्र ऑपरेशन करण्यात आले. काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षाबलांनी आपली रणनीती बदलली असून, ऑपरेशन्सवर विशेष भर दिला जात आहे."
या ऑपरेशनमध्ये शोपियां जिल्ह्यातील शाहिद नावाच्या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. तो एका सरपंचाच्या हत्येसोबतच पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्याचा सहकारी एका परप्रांतीय मजुराच्या हत्येत सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
दहशतवाद्यांच्या ओजीडब्ल्यू आणि स्लीपर सेलवर नजर
SIA ने याआधीही ११ मे रोजी दक्षिण काश्मीरमध्ये २० ठिकाणी छापे मारले होते. या कारवाईत दहशतवाद्यांच्या ओव्हरग्राऊंड वर्कर्स (OGWs) आणि स्लीपर सेल नेटवर्क वर कारवाई करण्यात आली. हे लोक पाकिस्तानस्थित दहशतवादी मास्टरमाइंड्ससाठी संदेशवहनाचं काम करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संवेदनशील माहितीचा अपवापर
तांत्रिक नजरेखाली ठेवण्यात आलेल्या स्लीपर सेलमध्ये व्हॉट्सअॅप, टेलीग्राम आणि अन्य मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली जात होती. ही माहिती महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांबद्दल असल्याचं उघड झालं आहे.
सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुन्हा एकदा सुरक्षाबलांच्या वेळीच झालेल्या कारवाईमुळे मोठा हल्ला टळल्याचं स्पष्ट होत आहे. पाकिस्तानकडून घुसखोरी व स्लीपर सेलद्वारे होणाऱ्या कारवायांना अटकाव घालण्यासाठी आता SIA, पोलिस आणि लष्कर यांच्यात समन्वय अधिक बळकट केला जात आहे.