हरदोई जिल्ह्यातील रहिवासी असलेला सर्पमित्र रामबली हा गेल्या 20 वर्षांपासून लालपुल मोक्षधाममध्ये राहून शाहजहांपूरच्या रहिवाशांची सेवा करत होता. शहरात कोणाच्या घरी साप दिसला तर रामबलीला बोलावले जायचे. काही मिनिटांत सापांना पकडून तो जंगलात सोडून द्यायचा. परंतु त्याच रामबलीचा सर्प दंशामुळे मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामबलीने सर्पदंश झाल्यावर वनौषधी उपचार घेतले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि मग त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तो पर्यंत सापाचे विष त्याच्या संपूर्ण शरीरात भिनल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
Location :
Shahjahanpur,Uttar Pradesh
First Published :
July 30, 2023 3:28 PM IST