TRENDING:

तुम्ही बदला घेऊ नका, देव त्याला शिक्षा करेल; समाजकल्याण विभागाच्या ऑफिसमधील प्रकाराने सर्वजण हादरले

Last Updated:

कर्नाटकातील तुमकुरूमध्ये समाजकल्याण अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत कुटुंबियांसाठी भावनिक मेसेज पाठवला असून त्याने वरिष्ठांवर छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बेंगळुरू : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात एका समाजकल्याण अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सहकाऱ्यांना पाठवला असून त्यामध्ये त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या छळाचा आरोप केला आहे. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
News18
News18
advertisement

मल्लिकार्जुन हे समाजकल्याण विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पावगडाच्या अप्पा बांडे परिसरातील विभागीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी सहकाऱ्यांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी जिल्हा संचालक कृष्णप्पा यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

पावगडा तालुक्यातील गुंडरलहळ्ळी गावचे रहिवासी असलेल्या मल्लिकार्जुन यांनी आपल्या कुटुंबाबद्दलही चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची खूप काळजी घेतली, त्यांना सन्मान दिला. मात्र त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कुटुंबाला आधार देता येत नाही, याची खंत होती.

advertisement

माझ्या कुटुंबीयांनी कोणताही बदला घेऊ नये. देव आणि कायदा संबंधित व्यक्तीला शिक्षा करतील. माझी आई, पत्नी, मुलं माझ्या संपूर्ण कुटुंबाने माझी खूप चांगली काळजी घेतली. त्यांनी मला सन्मान दिला. पण मला त्यांना मदत करायची होती. अधिक काही करायचं होतं आणि आता ते शक्य होत नाही, असे मल्लिकार्जुन यांनी व्हिडिओत म्हटले.

advertisement

समाजकल्याण विभागातील कृष्णप्पा यांच्या छळामुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे. देव त्यांना शिक्षा करेल. त्यांच्या कुटुंबाची चूक नाही, त्यामुळे माझ्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर कोणताही बदला घेऊ नये. देव आणि कायदा नक्कीच त्यांना शिक्षा करतील, असेही त्यांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्याचे आरोप फेटाळले

दरम्यान शनिवारी कृष्णप्पा यांनी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मल्लिकार्जुन यांनी केलेले सर्व आरोप नाकारले. जिल्हा संचालकांनी सांगितले की, बेंगळुरू मुख्य कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीनुसार मल्लिकार्जुन यांना नोटीस देण्यात आली होती. या तक्रारीत काही अनियमिततेचे आरोप होते आणि त्याची चौकशी करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही चौकशी अद्याप सुरूही झाली नव्हती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

कृष्णप्पा यांनी असेही स्पष्ट केले की, मल्लिकार्जुन यांच्या निवृत्तीला केवळ दहा दिवस शिल्लक होते, त्यामुळे त्यांच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नव्हती. उलट त्यांनी स्वतः मल्लिकार्जुन यांच्या पेन्शन प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि त्याची पडताळणीही केली होती, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/देश/
तुम्ही बदला घेऊ नका, देव त्याला शिक्षा करेल; समाजकल्याण विभागाच्या ऑफिसमधील प्रकाराने सर्वजण हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल