लोकसभेत इटावा जिल्ह्यातल्या ७ नेत्यांनी विक्रम केलाय. ते सर्व ७ नेते उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. यात इटावातून जितेंद्र दोहरे, कन्नौजमधून अखिलेश यादव, मैनपुरीतून डिंपल यादव, आझमगढमधून धर्मेंद्र यादव, बदायूतून आदित्य यादव, फिरोजाबादमधून अक्षय यादव आणि एटामधून देवेश शाक्य यांनी विजय मिळवलाय.
advertisement
लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी तिकिटवाटप करताना सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार केला होता. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाशिवाय दुसऱ्या कोणत्याच यादव उमेदवाराला तिकिट दिलं नाही. इतकंच नाही तर फक्त चार मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवले. यादव कुटुंबातले सर्व पाच जण जिंकले. तसंच सर्व मुस्लीम उमेदवारही जिंकले. समाजवादी पार्टीने रामपूर, कैराना, मुरादाबाद आणि संभलमधून मुस्लीम उमेदवारांना उभा केलं होतं.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का देण्यात समाजवादी पार्टीची महत्त्वाची भूमिका राहिली. यामुळे एकट्या भाजपला बहुमत गाठता आले नाही. आता एनडीए सरकार स्थापन करताना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागेल.