जो बायडेन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरुन G20 मध्ये आपल्या भाषणाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, 'ज्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था हवामान संकट, नाजूकता आणि संघर्षाच्या अतिव्यापी धक्क्यांमुळे त्रस्त आहे. पण G20 अजूनही आमच्या सर्वात महत्त्वाच्या समस्या सोडवू शकतो, हे या वर्षीच्या शिखर परिषदेने सिद्ध केले आहे.'
advertisement
व्हिडिओमध्ये बायडेन यांनी म्हटलंय की, 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. हे या G20 शिखर परिषदेचे लक्ष्य आहे. या भागीदारीबद्दल आज आम्ही बोलत आहोत. आम्ही प्रादेशिक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अनेक देशांमध्ये आणि अनेक प्रदेशांमध्ये काम करत आहोत. आम्ही जहाजे आणि रेल्वेमध्ये गुंतवणूक करणार आहोत, जे भारत आणि युरोपला जोडतील. तसेच यामुळे भरपूर संधी निर्माण होतील. महागाईच्या मुद्द्यावरही जग एकत्र आहे. आम्ही येथे जे निर्णय घेऊ, ते पुढील अनेक दशकांच्या आमच्या भविष्यावर परिणाम करतील.
बायडन पुढे म्हणाले की, 'चला, एकत्र मिळून आपण यावर काम करावे आणि यावर गुंतवणूक करावी. जेव्हा आपण वाढत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करू तेव्हा सर्व अर्थव्यवस्थांना फायदा होईल. जेव्हा आपण भविष्यात आणि लोकांमध्ये गुंतवणूक करू, तेव्हा सगळीकडे लोकांना त्याचा फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी दिल्ली घोषणापत्र सर्व देशांना पटवून देण्यात यशस्वी ठरले. जगावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करता यावा, यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त करत अमेरिका आणि रशिया-चीन या दोन्ही गटांनी भारताशी सहमती दर्शवली.
