TRENDING:

डिस्प्ले बंद, हवेतच निघाला धूर, उपमुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग

Last Updated:

अजित पवारांच्या अपघाताची घटना ताजी असताना आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडींग करावं लागलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जानेवारी महिन्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या अपघातानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीवर देखील आरोप केले आहेत. व्हीआयपी लोकांनी विमान अथवा हेलिकॉप्टरने प्रवास करताना, संबंधित योग्य ती खबरदारी घ्यावी. संबंधित विमानं किंवा हेलिकॉप्टर किती धोकादायक असू शकतो, याची अनेक उदाहरणं रोहित पवारांनी दिली.
News18
News18
advertisement

अजित पवारांच्या अपघाताची घटना ताजी असताना आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडींग करावं लागलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य शनिवारी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनऊहून कौशांबीकडे जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला लखनऊ विमानतळावर तातडीने 'इमर्जन्सी लँडिंग' करावं लागलं. हेलिकॉप्टरच्या कॅबिनमध्ये अचानक धूर भरू लागल्याने मोठी खळबळ उडाली होती, मात्र सुदैवाने उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे सर्व जण सुखरूप आहेत.

advertisement

नेमकी घटना काय?

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे शनिवारी सकाळी १०:३० वाजता एका नियोजित कार्यक्रमासाठी लखनऊहून कौशांबीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी लखनऊ येथील एका कॉलेज मैदानावरील हेलिपॅडवरून उड्डाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या डॅशबोर्डवरील 'डिस्प्ले' अचानक बंद पडला. त्याच वेळी हेलिकॉप्टरच्या आत धूर जमा होऊ लागल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकांनी तत्काळ लखनऊ विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंग केलं.

advertisement

पाच जणांचा जीव धोक्यात

या हेलिकॉप्टरमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जण स्वार होते. यामध्ये मौर्य यांचे सहकारी विवेक आणि दोन अनुभवी वैमानिकांचा समावेश होता. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर हवेत असताना सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता, परंतु वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त करण्यात आली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटले की, "उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सुखरूप राहावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो." राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी व्यक्त केलेल्या या सद्भावनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
डिस्प्ले बंद, हवेतच निघाला धूर, उपमुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल