ज्योती मल्होत्रा तिच्या 'ट्रॅव्हल विथ जो' या यूट्यूब चॅनेलसाठी ओळखली जाते. तिने गेल्या दोन वर्षांत तीन वेळा पाकिस्तान, एकदा चीन, तसेच यूएई, बांगलादेश, भूतान आणि थायलंडची यात्रा केली आहे. दोन वर्षांपूर्वी ती पाकिस्तानी उच्चायोगातील अधिकारी दानिशच्या संपर्कात आली. पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तिने तेथील गुप्तचर अधिकारी आणि इतर लोकांशी भेट घेतली. भारतात परतल्यानंतर ज्योतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती शेअर केली आणि पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा लोकांसमोर आणण्याचे काम केले.
advertisement
पाक IAS अधिकाऱ्यासोबत लफडं, बालीला गेली अन् तिथंच देशद्रोही ज्योतीने कांड केलं
हनीट्रॅपमध्ये फसला देवेंद्र
पंजाब पोलिसांनी मालेरकोटला येथून गजाला आणि तिचा साथीदार यामीन मोहम्मद यांना अटक केली. गजालाचे काम दानिशकडून पैसे घेऊन ते जासूसंपर्यंत पोहोचवणे होते, तर यामीनही दानिशच्या संपर्कात होता. चौकशीदरम्यान ज्योतीसह इतर जासूसंची नावे उघड झाली. हरियाणातील कैथल येथून देवेंद्र सिंह नावाच्या युवकालाही अटक करण्यात आली. देवेंद्र 2024 मध्ये एका शीख जत्थ्यासह पाकिस्तानात गेला होता. जिथे तो आईएसआयच्या संपर्कात आला. त्याला हनीट्रॅपमध्ये फसवून पटियाला कॅन्टमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सांगण्यात आले होते.
अरमान पोहोचवायचा सामान
याशिवाय नूह येथून अरमान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जो सहा महिन्यांपूर्वी दानिशच्या संपर्कात आला होता. त्याला पैसे आणि सिम कार्ड देण्यात आले होते आणि त्याने डिफेन्स एक्सपोमधील फोटो पाकिस्तानला पाठवले होते. अरमान हा इतर जासूसंपर्यंत पैसे पोहोचवण्याचेही काम करत होता. पोलीस आता या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. जेणेकरून या जासूसी नेटवर्कचा पूर्णपणे पर्दाफाश होऊ शकेल. ही कारवाई भारताच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱ्या या नेटवर्कला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
गद्दार इन्फ्लुएंसर! यूट्यूबर ज्योती निघाली देशद्रोही; पाकिस्तानसाठी केली हेरगिरी
आरोपींची कुंडली:
मलेरकोटला, पंजाब:
गजाला: 32 वर्षीय मुस्लिम विधवा, पाक व्हिसासाठी 4 महिन्यांपूर्वी पीएचसीमधील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशला भेटली. दानिशने तिला प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले आणि पैसे पाठवण्यास सुरुवात केली. नंतर गजालाचा वापर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी एजंट्सपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी करण्यात आला.
यामीन मोहम्मद: हा दुसरा आरोपीही याच प्रकारे दानिशच्या संपर्कात आला आणि व्हिसा मिळवण्याचे काम करू लागला. दोघांनाही अधिकृत गोपनिय कायदा आणि बीएनएस अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
कैथल, हरियाणा:
देविंदर सिंह ढिल्लों: एक शीख युवक आणि पटियाला येथील विद्यार्थी. नोव्हेंबर 2024 मध्ये गुरु नानक जयंतीनिमित्त पाकिस्तानात गेला होता.तेथे पाक एजंट्सनी (PIOs) त्याची चांगली सरबराई केली आणि भेटवस्तू दिल्या. कारण त्यात "हनी ट्रॅप" ची शक्यता दिसली. त्याला व्हॉट्सॲप कॉलद्वारे पटियाला कॅन्टचे व्हिडिओ आणि माहिती पाठवण्यास सांगण्यात आले.
हिसार, हरियाणा:
ज्योती मल्होत्रा: हिंदू अविवाहित महिला आणि 'ट्रॅव्हल विथ जो' या यूट्यूब चॅनेलची ट्रॅव्हल ब्लॉगर. ती प्रथम दानिशच्या संपर्कात आली, त्यानंतर पाकिस्तानच्या PIOs शी तिची भेट घडवण्यात आली.तिने गेल्या दोन वर्षांत तीन वेळा पाकिस्तान आणि इतर देशांची (चीन, बांगलादेश, थायलंड, नेपाळ, भूतान, यूएई) यात्रा केली.तिला सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दर्शवण्याचे काम सोपवण्यात आले होते.
तिचे PIO च्या एका एजंटसोबत घनिष्ठ संबंध होते आणि दोघेही अलीकडेच बाली (इंडोनेशिया) मध्ये एक आठवडा एकत्र राहिले होते. तिच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर पाकिस्तानच्या हितासाठी करण्यात आला.
नूह, हरियाणा:
अरमान: स्थानिक मुस्लिम युवक, 6 महिन्यांपूर्वी व्हिसासाठी दानिशच्या संपर्कात आला. पैशांच्या बदल्यात त्याला तयार करण्यात आले. त्याने त्याचे भारतीय सिम दानिशला दिले आणि दुसऱ्या सिमवर व्हॉट्सॲप सक्रिय केले, जे पाकिस्तानी एजंट वापरत होते. त्याला डिफेन्स एक्सपो 2025 च्या ठिकाणी जाऊन फोटो काढण्यास आणि पाठवण्यास सांगण्यात आले. तो देखील पैसे हस्तांतरित करण्याचे काम करत होता.