Maruti Suzuki Ertiga CNG ही यादीत पहिली 7 सीटर एमपीव्ही आहे. मागील वर्षी मारुतीने गेल्या वर्षी मारुतीने Maruti Suzuki Ertiga CNG चे 1,29,920 युनिट्स विकले होते. कंपनी ही कार फक्त 10,76,300 च्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध करून दिली आहे. Maruti Suzuki Ertiga CNG मध्ये 1.5 लिटर NA पेट्रोल इंजिन 87 बीएचपी पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते.
advertisement
Maruti Suzuki Ertiga CNG ही मायलेजच्या बाबतीही बेस्ट आहे. कंपनीने दावा केला आहे की, १ किलो CNG मध्ये 26.11 KM/KG मायलेज देते. फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर 9-इंच टचस्क्रीन स्मार्टप्ले प्रो सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, रिअर AC वेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, 7-सीटर लेआउट आणि सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ABS सोबत EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर पॉइंट्स सारखे फिचर्स आहे.
टाटा मोटर्सच्या Punch चा रेकॉर्ड
दुसऱ्या क्रमांकावर आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सची Tata Punch ही टँकसारखी मजबूत अशी मिड साईज एसयूव्ही आहे. मागील वर्षी Tata Punch ची 71,113 युनिट्स विकले गेले होते. टाटाने मागील वर्षी मिड साईज एसयूव्हीमध्ये विक्रीचा रेकॉर्ड केला होता.
मारुतीच्या साम्राज्याला टाटा पंचनेच धक्का दिला होता. 'Tata Punch CNG ही शहरात २४ किमी इतकं मायलेज देते, तर हायवेवर सर्वाधिक २६ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. तर Nexon चे 34,712 युनिट्स, Tiago चे 15,775 युनिट्स, Altroz चे 10,831 युनिट्स आणि Tigor चे 7,029 युनिट्स विकले आहेत.
Hyundai तिसऱ्या क्रमांकावर
तिसऱ्या क्रमांकावर कोरियन कंपनी Hyundai आहे. गेल्या वर्षी Hyundai Aura चे 49,464 युनिट्स विकले गेले होते. Hyundai Aura मध्ये १.२ लिटरचं इंजिन दिलं आहे. Hyundai Aura CNG मॉडेल हे २० ते २५ किमी मायलेज देते. Exter चे 18,528 युनिट्स आणि Grand i10 ची 11,275 युनिट्स विकले गेले होते.
टोयोटा चौथ्या क्रमांकावर
CNG गाड्यांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे टोयोटा. टोयोटा कंपनीने Rumion ची 11,137 युनिट्स विकले होते. Rumion ही मारुती सुझुकीच्या एर्टिगाच्या बेसवरच तयार केली आहे. फक्त या Rumion ची बांधणी टोयोटाच्या कारखान्यात झाली आहे. त्यामुळे मायलेजच्या बाबती Rumion CNG व्हेरियंटमध्ये २६ किमी मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. तर Glanza चे 6,612 युनिट्स, Urban Cruiser Taisor चे 5,380 युनिट्स आणि Urban Cruiser Hyryder चे 4,960 युनिट्स विकले होते.
