4G आणि LTE मध्ये काय फरक?
अनेकदा लोक 4G आणि LTE ला वेगवेगळं समजतात. तर खऱ्या अर्थाने LTE (Long Term Evolution) ही 4G टेक्निकचा एक प्रगत रुप आहे. जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये 4G दिसो किंवा LTE दोन्हीचा हेतू हाय-स्पीड डेटा देणेच असते. तुमच्या परिसरात 5G उपलब्ध नसेल तर 4G/LTE मोड एक स्थिर आणि बॅलेंस्ड पर्याय सिद्ध होतो.
advertisement
तुमचं मुल वारंवार फोन मागतं का? फॉलो करा 3 ट्रिक, सुटेल सवय
5G
5G नेटवर्क शानदार स्पीड देते विशेषतः चांगले कव्हरेच असलेल्या मोठ्या शहरांमध्ये. मूव्ही डाउनलोड, क्लाउड गेमिंग आणि हेवी फाइल स्ट्रान्सफरसाठी 5G बेस्ट आहे. मात्र सिग्नल कमकुवत असल्यावर प्रॉब्लम होतो. अशा परिस्थितीत फोन वारंवार 4G आणि 5G दरम्यान स्विच करतो ज्यामुळे बॅटरी वेगाने कमी होते.
Jio आणि Airtel सारखे टेलिकॉम ऑपरेटर भारतात 5G सेवा देत आहेत, परंतु त्यांची क्वालिटी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये एकसारखी नाही. म्हणूनच, फक्त 5G चालू असणे नेहमीच शहाणपणाचे नसते.
बॅटरी बॅकअपवर नेटवर्कचा परिणाम
तुम्ही अशा परिसरात राहता जिथे 5G सिग्नल कमकुवत असेल तर 5G Auto किंवा फक्त 5G मोड बॅटरी जास्त खर्च करेल. तेथेच 4G/LTE मोडवर फोन जास्त स्थिर राहतो आणि पॉवर कमी लागते. विशेषतः ऑफिस, घर किंवा प्रवासादरम्यान जिथे कव्हरेज अनिश्चित असेल. तिथे 4G मोड बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.
पोस्ट ऑफिसच्या नावावर मेसेज आलाय? एका क्लिकमध्ये रिकामं होऊ शकतं अकाउंट, व्हा अलर्ट
तुम्ही कोणती सेटिंग निवडावी?
तुमच्या शहरातील 5G कव्हरेज मजबूत आणि स्थिर असेल, तर 5G ऑटो मोड आदर्श आहे. तसंच, नेटवर्क वारंवार बदलत असेल किंवा तुमची बॅटरी लवकर संपत असेल, तर 4G/LTE वर स्विच करणे शहाणपणाचे ठरेल. सर्वोत्तम नेटवर्क मोड तुमच्या लोकेशन आणि गरजांवर अवलंबून असतो. काही सेटिंग्ज बदलून, तुम्ही चांगला इंटरनेट स्पीड आणि जास्त बॅटरी लाइफ दोन्ही मिळवू शकता.
