तुम्ही भीम अॅपवर नवीन यूझर असाल आणि 20 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम भरली असेल तर तुम्हाला 20 रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. या मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त नवीन यूझर्सना डिजिटल पेमेंटशी जोडणे आणि त्यांना सोयीस्कर आणि सुरक्षित अनुभव प्रदान करणे आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
बँकेपेक्षा जास्त व्याजदर देणारी Post office ची भन्नाट स्कीम, महिन्याला कमवा 5,550 रुपये
advertisement
एका महिन्यात ₹300 पर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी
भीम अॅपची डेव्हलपर NPCI BHIM Services Limited (NBSL) नुसार, नवीन यूझर दैनंदिन खर्चासाठी भीम वापरत असतील तर त्यांना एका महिन्यात ₹300 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. यामध्ये किराणा खरेदी, बस किंवा मेट्रो तिकिटे, मोबाईल रिचार्ज, वीज आणि गॅस बिल पेमेंट आणि पेट्रोल खर्च यासारख्या व्यवहारांचा समावेश आहे.
15 पेक्षा जास्त भारतीय भाषांसाठी सपोर्ट
भीम अॅप सध्या 15 पेक्षा जास्त भारतीय भाषांना सपोर्ट करते. ते जाहिरातमुक्त आहे आणि कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही चांगले काम करते.
सहकारी बँकिंगमध्ये मोठी उलथापालथ, RBI चा मोठा निर्णय; 4 बँकांचे विलीनीकरण, फक्त 2 बँका उरणार
नवीन आणि उपयुक्त फीचर्ससह येते
यूझर्सच्या सोयीसाठी भीम अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत, जसे की स्प्लिट एक्सपेन्स, फॅमिली मोड, स्पेंड अॅनालिटिक्स, अॅक्शन नीडेड, यूपीआय सर्कल आणि बरेच काही. याव्यतिरिक्त, यूपीआय सर्कल फुल डेलिगेशन फीचर लाँच करण्यात आले आहे, ज्यामुळे यूझर्सना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, मुलांना, कर्मचाऱ्यांना किंवा अवलंबितांना एका निश्चित मर्यादेत यूपीआय पेमेंट करण्याची परवानगी मिळते.
IMF देखील UPIचा चाहता
भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आता जगभरात ओळखली जात आहे. भारताव्यतिरिक्त, जगभरातील अनेक देशांमध्ये UPI चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने देखील त्याचे उघडपणे कौतुक केले आहे. IMF ने मान्य केले आहे की भारताची UPI आता जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे.
