TRENDING:

'कसाय दणका... बाळा नादी लागू नको...', काल राडा आज दंड थोपटत मल्हार पाटलांचं ओमराजेंना चॅलेंज!

Last Updated:

Dharashiv Politics : धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविल्यानंतर मल्हार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुले चॅलेंज दिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Malhar Patil vs Omraje nimbalkar (बालाजी निरफळ, प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठीत अशा दोन घरण्यात पुन्हा मोठा राडा पहायला मिळत आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात काल मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही कुटूंबामध्ये आता वाद पेटल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक अधिक चर्चेत आलीये. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविल्यानंतर मल्हार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुले चॅलेंज दिलं आहे.
Malhar Patil vs Omraje nimbalkar
Malhar Patil vs Omraje nimbalkar
advertisement

जिल्हा परिषद जिंकून दाखवण्याचे चॅलेंज

विरोधकांचा बाजार उठला असून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील. नगर परिषद निकालानंतर मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना जिल्हा परिषद जिंकून दाखवण्याचे चॅलेंज दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखविले असल्याचे सांगत महायुतीची जिल्ह्याची टीम चांगली आहे. महायुतीची जिल्ह्याची टीम पूर्ण ताकतीने काम करेल व सर्व जागावर यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

advertisement

कसाय दणका...

कसाय दणका... असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसेच रडू नको बाळा.. नादी लागु नको, बदाबदा बडवीन... गाण्यावर ठेका धरत मल्हार पाटील यांनी दंड थोपटत ओमराजे निंबाळकर यांना चॅलेंज दिले आहे. मी नगरपरिषद निवडणुकीवेळी सांगितलं होतं की, जिल्हा परिषदेत सत्ता येणार त्यानुसार सत्ता आली. आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्याशिवाय मल्हार पाटील शांत बसणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

advertisement

'इकडे बघ' म्हणत खुन्नस दिली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दरम्यान, काल जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर होण्याच्या सुमारास एक घटना घडली. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील हे जिल्हा परिषद इमारतीतून बाहेर पडत होते. त्याच वेळी जयराजे निंबाळकर हे आपल्या समर्थकांसह समोरून आले. राणा पाटील यांना पाहताच जयराजेंनी मागे बघत 'इकडे बघ' असे म्हणत त्यांना थेट खुन्नस दिली. त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'कसाय दणका... बाळा नादी लागू नको...', काल राडा आज दंड थोपटत मल्हार पाटलांचं ओमराजेंना चॅलेंज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल