रांची : अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान एक प्रश्न असतो की, मासिक पाळीदरम्यान, जिममध्ये जावे का, योगा करावा का. कारण या दिवसात आराम करण्याचा सल्ला दिला जातो. खूप धावपळ न करता त्या दरम्यान, व्यायाम थांबवण्याचा सल्ला दिला जातो. पण, या काळात खरोखरच व्यायाम करू नये का? याबाबत जाणून घेऊयात.
रांची येथील बरियातू रोड स्थित आलम हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट (MBBS, MD) डॉ. सबरीना यांच्याशी न्यूज18 लोकलच्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या समाजात एक समज आहे की जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर तुम्ही विश्रांती घ्यावी. अंथरुणावर राहावे. जास्त धावपळ करू नये. तसेच आराम करावा. मात्र, हा विचार पूर्णपणे चुकीची आहे.
advertisement
जिम आणि योग किती
डॉ. सबरीना यांनी सांगितले की, मासिक पाळीदरम्यान, तुम्ही जिम आणि योगा सहज करू शकता, पण जर तुम्ही जिममध्ये जाऊन योगा करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जिममध्ये 10 आणि 20 किलो वजनाच्या खूप जड वस्तू उचलणे टाळा. तसेच सायकलिंग, कार्डिओ किंवा स्टिचिंग करावे. यावेळी वजन उचलणे टाळा. कारण, यामुळे शरीरावर आणि गर्भाशयावर भार पडतो.
योगा करताना ही आसन करू नका
तसेच योगासने करताना तुम्ही सूर्यनमस्कार किंवा अनुलोम विलोम यासारख्या गोष्टी सहज करू शकता. मात्र, उलट्या स्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण, यामुळे रक्ताचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागतो. यामुळे हा प्रवाह मासिक पाळीत तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. याशिवाय तुम्ही सोपी आसने करू शकता, त्यात काहीही नुकसान नाही.
ही काळजी घ्या -
डॉ. सबरीना यांनी सांगितले की, मासिक पाळीच्या दरम्यान जिम किंवा योगा करा. जास्त वजन उचलू नका आणि कोणतेही जड किंवा खूप वाकवणारे योगासन करू नका. यामुळे गर्भाशयावर दबाव येतो, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
Disclaimer : ही बातमी तज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. हा व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी न्यूज18 लोकल जबाबदार राहणार नाही.