याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए जलमार्गावर ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय जेएनपीएने घेतला आहे. त्यानुसार येत्या 22 सप्टेंबरपासून दोन ई-वॉटर टॅक्सी गेटवे ते जेएनपीएदरम्यान धावणार आहेत. गेटवे ते जेएनपीएदरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी एक तास किंवा कधी त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो.
Festival Special Train: चाकरमान्यांचा दसरा-दिवाळीही होणार खास, कोकणासाठी विशेष ट्रेन, बघा वेळापत्रक
advertisement
ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत असल्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे ही पर्यावरणपूरक ई-वॉटर टॅक्सी परदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली आहे.
ई-वॉटर टॅक्सींची वैशिष्ट्ये
समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात बांधणी झालेल्या या दोन वॉटर टॅक्सींपैकी एक वॉटर टॅक्सी सौरऊर्जेवर चालते तर दुसरी विजेवर चालते. या बोटींची प्रवासी क्षमता 20 आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए दरम्यान या सेवेचा लाभ घेण्यासाठी 100 तिकीट आकारलं जाण्याची शक्यता आहे. या ई-वॉटर टॅक्सीच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुप यांच्याकडे सोपवली आहे.