Festival Special Train: चाकरमान्यांचा दसरा-दिवाळीही होणार खास, कोकणासाठी विशेष ट्रेन, बघा वेळापत्रक

Last Updated:

Festival Special Train: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते.

Festival Special Train: चाकरमान्यांचा दसरा-दिवाळीही होणार खास, कोकणासाठी विशेष ट्रेन, बघा वेळापत्रक
Festival Special Train: चाकरमान्यांचा दसरा-दिवाळीही होणार खास, कोकणासाठी विशेष ट्रेन, बघा वेळापत्रक
मुंबई: गणेशोत्सवापाठोपाठ शारदीय नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे उत्सव येतात. सणासुदीच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर असलेले लोक आपापल्या गावी जातात. परिणामी या काळात वाहतुक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने सणासाठी विशेष ट्रेन चालवण्याच्या निर्णय घेतला आहे.
दसरा-दिवाळी सणाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष साप्ताहिक ट्रेन जाहीर केली आहे. ही गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत एकूण फेऱ्या करणार आहे. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीदरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01463 एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल.
advertisement
गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ-एलटीटी विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून 4 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सवंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुर, उडीपी, मंगलोर, कासरगोड, कान्नूर, कालिकट, तिरूर, शोरानूर, त्रिचूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कयंकुलम जंक्शन आणि कोल्लम या स्टेशन्सवर थांबेल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Festival Special Train: चाकरमान्यांचा दसरा-दिवाळीही होणार खास, कोकणासाठी विशेष ट्रेन, बघा वेळापत्रक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement