TRENDING:

मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, 100 दिग्गजांच्या यादीत पहिल्या स्थानावर

Last Updated:

पाच जणांची या यादीत पुन्हा एंट्री झाली आहे. त्यामध्ये बेंगळुरूस्थित डेव्हलपर प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्सच्या इरफान रझाक आणि भावंडांचा समावेश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिंगापूर (10 ऑक्टोबर, 2024): फोर्ब्जच्या 2024मधील यादीनुसार भारतातील 100 श्रीमंतांची एकत्रित संपत्ती प्रथमच ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी ही एकत्रित संपत्ती 799 अब्ज डॉलर्स होती. या वर्षी त्यात 40 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1.1 ट्रिलियन डॉलर्स झाली आहे. ही यादी www.forbes.com/india आणि www.forbesindia.com वर तसेच फोर्ब्ज एशियाच्या ऑक्टोबरच्या अंकात उपलब्ध आहे.
News18
News18
advertisement

गुंतवणुकदारांनी विक्रमी गतीने आयपीओ आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे भारतात बुल मार्केट सुरू आहे. यामुळे भारतातील बेंचमार्क बीएसई सेन्सेक्सने 30 टक्क्यांनी उसळी घेतलेली आहे. परिणामी, या यादीतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती आणखी श्रीमंत झाल्या आहेत. 58 जणांच्या निव्वळ संपत्तीमध्ये 1 बिलियन डॉलर्स किंवा त्याहून अधिकची भर पडली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी 119.5 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. 2023 च्या तुलनेत यावर्षी त्यांच्या संपत्तीत 27.5 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. अंबानी या वर्षी डॉलरच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा फायदा मिळवणारे उद्योगपती होते.

advertisement

यूएस-बेस्ड हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी केलेल्या शॉर्ट-सेलिंग हल्ल्यातून सावरत 'इन्फ्रास्ट्रक्चर टायकून' गौतम अदानी डॉलरच्या बाबतीत सर्वांत जास्त फायदा मिळवणारे भारतीय आहेत. सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांनी दुसरं स्थान कायम राखलं आहे.

भाऊ विनोदसोबत काम करून त्यांनी कुटुंबाच्या संपत्तीत 48 बिलियन डॉलर्सची भर घालत एकूण संपत्ती 116 बिलियन डॉलर्सवर नेली. अदानी यांनी आपल्या मुलांना आणि पुतण्यांना महत्त्वाच्या पदांवर बसवून पुढील पिढी उद्योगात उतरवली आहे.

advertisement

स्टील-टू-पॉवर समूह असलेल्या ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर पोहचल्या आहेत. 19.7 बिलियन डॉलर्सच्या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती 43.7 बिलियन डॉलर्स झाली आहे. मुलगा सज्जन जिंदाल यांनी अलीकडेच एमजी मोटरसह इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये महत्त्वाकांक्षी पाऊल टाकलं आहे.

टेक टायटन शिव नाडर चौथ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 40.2 बिलियन डॉलर्स आहे. जिंदाल आणि नाडर यांनी आपल्या संपत्तीमध्ये 10 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त भर घातली आहे. पुण्याचे उद्योगपती सायरस पूनावाला 24.5 बिलियन डॉलर्स संपत्ती सह या यादीत नवव्या स्थानी आहेत.

advertisement

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप संघवी यांनी तीन स्थानांनी झेप घेत पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्यांची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या 19 बिलियन डॉलर्सवरून 32.4 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहेत. त्यांच्या सुधीर आणि समीर मेहता (क्रमांक 16) ही भावंडांची संपत्ती दुप्पट होऊन 16.3 बिलियन डॉलर्स झाली आहे. त्यांच्या टोरेंट ग्रुपचं फ्लॅगशिप टोरेंट फार्मास्युटिकल्स नवीन अधिग्रहणाकडे लक्ष देत आहे.

advertisement

एशिया वेल्थ एडिटर आणि फोर्ब्ज एशियाच्या इंडिया एडिटर नाझनीन करमाली म्हणाल्या, "भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या भरभराटीने सर्वांत श्रीमंत टायकून्सला फायदा झाला आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी नवीन उंची गाठली आहे. गुंतवणूकदारांच्या उत्साहाने संपत्ती वाढीला चालना दिली आहे. परिणामी भारतातील 100 श्रीमंतांच्या एकत्रित संपत्तीने ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे."

या यादीत चार नवोदितांनी प्रवेश केला आहे. त्यापैकी दोन फार्मास्युटिकल कंपन्यांचे मालक आहेत. हेटेरो लॅबचे संस्थापक बी. पार्थ सारधी रेड्डी 3.95 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह 81व्या क्रमांकावर आहेत. त्यांची कंपनी जेनेरिक औषधे आणि फार्मास्युटिकल घटक बनवते. लस उत्पादक बायोलॉजिकल ईच्या महिमा दतला 3.3 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह 100 व्या क्रमांकावर आहेत.

शाही एक्सपोर्ट्सचे मालक हरीश आहुजा 3.8 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह 84 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची कंपनी H&M आणि केल्विन क्लेन सारख्या लेबल्सला कच्चा माल पुरवते. प्रीमियर एनर्जीचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेंदर सलुजा 3.7 बिलिनय डॉलर्स संपत्तीसह 85 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची कंपनी सौर पॅनेल आणि मॉड्यूल बनवते. ही कंपनी सप्टेंबरमध्ये मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे.

गोदरेज कुटुंबाने एप्रिलमध्ये समुहातील कंपन्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली. आदि आणि नादिर गोदरेज 11.2 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह 21 व्या क्रमांकावर आहेत. हे दोघे गोदरेज समुहातील लिस्टेड कंपन्या नियंत्रित करतात. त्यांचे चुलत भाऊ जमशीद गोदरेज आणि स्मिता कृष्णा गोदरेज 11.1 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह 22 व्या क्रमांकावर आहेत. हे दोघे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप अंतर्गत असलेल्या खासगी कंपन्या नियंत्रित करतात.

पाच जणांची या यादीत पुन्हा एंट्री झाली आहे. त्यामध्ये बेंगळुरूस्थित डेव्हलपर प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्सच्या इरफान रझाक आणि भावंडांचा समावेश आहे. 6 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह ते 49 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची कंपनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.

यादी तयार करण्यासाठीचा कटऑफ 3.3 बिलियन डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी तो 2.3 बिलियन होता.

भारतातील सर्वात 10 श्रीमंत व्यक्ती

1) मुकेश अंबानी: 119.5 बिलियन डॉलर्स

2) गौतम अदानी: 116 बिलियन डॉलर्स

3) सावित्री जिंदाल: 43.7 बिलियन डॉलर्स

4) शिव नाडर: 40.2 बिलियन डॉलर्स

5) दिलीप संघवी: 32.4 बिलियन डॉलर्स

6) राधाकिशन दमानी: 31.5 बिलियन डॉलर्स

7) सुनील मित्तल: 30.7 बिलियन डॉलर्स

8) कुमार बिर्ला: 24.8 बिलियन डॉलर्स

9) सायरस पूनावाला: 24.5 बिलियन डॉलर्स

10) बजाज कुटुंब: 23.4 बिलियन डॉलर्स

कुटुंबं आणि व्यक्तींकडून मिळालेली आर्थिक माहिती, शेअरहोल्डिंग, स्टॉक एक्स्चेंज, विश्लेषक आणि भारताच्या नियामक एजन्सी यांच्याकडून मिळवलेली वापरून ही यादी तयार केली गेली. या यादीमध्ये बजाज आणि बर्मन यांच्यासारख्या उद्योजक घराण्यांच्या समावेश आहे, ज्यांनी आपल्या विस्तारित कुटुंबाच्या मदतीने व्यवसाय विस्तारला आहे.

27 सप्टेंबरपर्यंत शेअरच्या किमती आणि एक्सचेंज रेट्सच्या आधारे संपत्तीची गणना केली गेली. खासगी कंपन्यांचे मूल्य सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या कंपन्यांच्या आधारे ठरवलं गेलं. या यादीमध्ये व्यवसाय, निवास किंवा देशाशी संबंध असलेले परदेशी नागरिक किंवा देशात राहत नसलेल्या व्यक्तींचा देखील समावेश असू शकतो.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय, 100 दिग्गजांच्या यादीत पहिल्या स्थानावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल