अल्मोडा : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे अनेकांना विविध प्रकारच्या रिल्सचं वेड लागलं आहे आणि ते रिल्स तयार करण्यासाठी अनेक जण धोकादायक स्टंटही करत आहेत. या धोकादायक स्टंट्समुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, अशा घटना समोर आल्या आहेत.
यूनिक दिसण्यासाठी किंवा सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करत आहेत. मात्र, आता आता जीवघेणे रील्स तयार करणाऱ्यांवर किंवा स्टंटबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. जर तुम्ही रिल्स बनवण्यासाठी स्टंटबाजी करणार असाल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. कारण अशा स्टंटबाजांवर आता पोलिसांची नजर राहणार आहे. पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले आहे.
advertisement
अलीकडेच पोलिसांनी काही तरुणांना स्टंटबाजी करताना पकडले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत स्टंटबाजी आणि रॅश ड्रायव्हिंग हे नियमांच्या विरोधात आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
मेट्रोत चुकूनही या वस्तू नेऊ नका, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, तुरुंगातही होणार रवानगी!
उत्तराखंडच्या अल्मोडा येथे पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. अल्मोडा येथील वाहतूक पोलिस कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जर कोणी स्टंट करताना दिसले तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹ 2000 चा दंड आकारला जातो. याशिवाय वाहन जप्ती, न्यायालयीन कारवाईही होऊ शकते. इतकेच नव्हे तर वाहन चालवणाऱ्याचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. वाहतूक नियमांच्या कलमांखाली पोलीस इतर कारवाईसुद्धा करू शकतात.
दुसऱ्यांचाही जीव धोक्यात जातो -
लोकल18 शी बोलताना अल्मोडाचे एसएसपी देवेंद्र पींचा यांनी सांगितले की, रील बनवणे कोणतीही चुकीची बाब नाही. पण स्टंटबाजी करत जे रील तयार केले जातात, ते चुकीचे आहे. असे लोक आपलाच जीव धोक्यात टाकतात. सोबतच इतर लोकांचा जीवही धोक्यात टाकतात. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर एमव्ही कायद्यांतर्गत कारवाई केली जाते.
स्टंटबाजी करताना आढळल्यावर त्या व्यक्तीची गाडीही जप्त केली जाऊ शकते. म्हणून स्टंटबाजी करणाऱ्यांवर सक्त कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना आपल्या सुरक्षेसह इतरांच्या सुरक्षांचेही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
