TRENDING:

बिया कमी, गर जास्त... कोल्हापूरच्या बाजारात 'बाळानगरी' सीताफळ दाखल; आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ!

Last Updated:

Balanagari Custard Apple benefits : आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि चवीला गोड असणाऱ्या सीताफळांचा हंगाम आता सुरू झाला आहे. कोल्हापूरच्या बाजारपेठेत सध्या बिया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Balanagari Custard Apple benefits : आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि चवीला गोड असणाऱ्या सीताफळांचा हंगाम आता सुरू झाला आहे. कोल्हापूरच्या बाजारपेठेत सध्या बिया कमी आणि गर जास्त असणाऱ्या 'बाळानगरी' देशी सीताफळांची आवक वाढू लागली आहे. घाऊक बाजारात या सीताफळांना 180 रुपये प्रति किलो भाव मिळत असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Balanagari Custard Apple benefits
Balanagari Custard Apple benefits
advertisement

'बाळानगरी' सीताफळांची खासियत

बाजार समितीतील फळ व्यापारी सांगतात की, 'बाळानगरी' सीताफळ चवीला अत्यंत गोड असून, त्याचे वजनही चांगले असते. काही सीताफळे अर्धा किलो ते एक किलो वजनाचीही आहेत. त्यामुळे त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. सध्या वाई आणि अथणी येथून ही सीताफळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत येत आहेत.

यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सीताफळांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शेतकरी सांगतात. तरीही, कोल्हापूर बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात माल पाठवत आहेत.

advertisement

सीताफळाचे आरोग्यदायी फायदे (Balanagari Custard Apple benefits)

सीताफळ हे केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
  • रक्त सुधारते आणि हाडे मजबूत होतात.
  • पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
  • त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते.
  • advertisement

  • हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते.

हे ही वाचा : Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, कोकणात वेगळीच स्थिती, मुंबईसह 6 जिल्ह्यांचा हवामान अंदाज

हे ही वाचा : कृषी हवामान : शेतकऱ्यांनो! आता सुट्टी नाही, तुफान पाऊस पडणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पिकांसाठी उपाययोजना काय?

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बिया कमी, गर जास्त... कोल्हापूरच्या बाजारात 'बाळानगरी' सीताफळ दाखल; आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल