TRENDING:

Bullet Train : केंद्रात बुलेट ट्रेनची चर्चा थंडावली, भारताचं 'हाय-स्पीड स्वप्न' अपूर्ण राहणार का? 

Last Updated:

भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मंदीचे सावट आहे. जपानसोबत गाड्या आयातीच्या चर्चांमध्ये किंमत आणि देखभाल खर्चामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या अडचणींमुळेही प्रकल्प लांबणीवर पडतोय. 2022 मध्ये जाहीर केलेल्या निविदेनुसार, 24 बुलेट ट्रेनसाठी 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारताचे बुलेट ट्रेनचे स्वप्न आणखी लांबणीवर पडणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, जपानकडून बुलेट ट्रेन (शिंकान्सेन) आयात करण्यावर विचार थांबवण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र प्रकरणाशी संबंधित एका विश्वासार्ह सूत्राने सांगितले की, चर्चा पूर्णपणे थांबलेली नसली तरी ती खूपच सक्रियता दिसत नाहीत.
News18
News18
advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार जपानी सरकारसोबत गाड्या आयातीसाठी अद्याप चर्चेत सुरू आहेत, पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यात सक्रियता दिसत नाही. यामागचं कारण म्हणजे ट्रेनच्या किंमतीशी संबंधित मतभेद. ट्रेनची किंमत आणि तिच्या देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चावर सहमती होत नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जपानला भेट देऊन या चर्चेचा पाठपुरावा केला, मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही.

advertisement

हे ही वाचा : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? लिंबू, गुलाबजल वापरावं का? डॉक्टरांचा सल्ला

प्रकरणाशी संबंधित दुसऱ्या अधिकाऱ्याने मनीकंट्रोलला सांगितले की, "शिंकान्सेन आयात करणे हे प्रचंड महागडं आहे. शिवाय, जपानी कंपनीला त्याची आयुष्यभर देखभालही करावी लागते. या देखभाल खर्चामुळे एकूण व्यवहारात मोठा तफावत तयार होत आहे."

अहवालानुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरुवातीला व्यवस्थित सुरू होती, पण किंमत सोडवण्याच्या प्रयत्नात दोन मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. पहिली, सरकारकडून जमीन अधिग्रहणात झालेला विलंब आणि दुसरी, संयुक्त उद्यमाच्या अटींमध्ये झालेला बदल. जपानी सरकारच्या मते, भारत सरकारने जमीन अधिग्रहणाचा खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक डिझाइनमध्ये बदल केला. यापूर्वी फक्त 28 टक्के ट्रॅक उंचावर (एलेव्हेटेड) बांधला जाणार होता, मात्र बदलांनंतर 90 टक्के ट्रॅक उंचावर बांधण्याचा निर्णय झाला.

advertisement

हे ही वाचा : दिलजीतने खरंच ‘दिल’ जिंकलं! अवघ्या 50 सेकंदात करून दाखवली Record Breaking कामगिरी

2022 मध्ये नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने 24 बुलेट ट्रेन आयातीसाठी निविदा काढली होती, ज्यासाठी 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. 2018 मध्ये एका दहा कोचच्या बुलेट ट्रेनची किंमत 389 कोटी रुपये होती, जी 2023 पर्यंत 460 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bullet Train : केंद्रात बुलेट ट्रेनची चर्चा थंडावली, भारताचं 'हाय-स्पीड स्वप्न' अपूर्ण राहणार का? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल