14 हजार इंजिनमध्ये बसणार AI कॅमेरे : मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेल्वे ट्रॅक व ट्रेनच्या सुरक्षेसाठी 14000 इंजिनमध्ये AI आधारित कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कॅमेरे फक्त साधे कॅमेरे नसून, त्यात लेसर तंत्रज्ञानाची जोड असेल. रेल्वे ट्रॅकवर काही संशयास्पद गोष्ट आढळल्यास, लेसर लाईट त्यावरून परत येईल आणि कॅमेऱ्याला संदेश मिळेल. हे कॅमेरे AI तंत्रज्ञानावर आधारित असल्याने लगेचच लोको पायलटला सूचना मिळेल, ज्यामुळे तो आवश्यक ती पावले उचलू शकेल. मंत्रालयानुसार, हे काम लवकरच सुरू होणार असून, वर्षभरात पूर्ण करण्याची योजना आहे.
advertisement
प्रत्येक इंजिनमध्ये चार AI कॅमेरे बसणार : प्रत्येक इंजिनमध्ये 4 कॅमेरे बसवले जातील. यातील 2 कॅमेरे पुढच्या बाजूस आणि दोन कॅमेरे मागच्या बाजूस बसवले जातील. यामुळे दोन्ही बाजूंचे निरीक्षण होऊ शकते. AI कॅमेरा लेसर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लांबवर ठेवलेल्या अडथळ्यांचे किंवा संशयास्पद वस्तूंचे निरीक्षण करेल आणि ओळखेल. अडथळा नेमका कसा आहे, जसे तो प्राणी आहे का, माणूस आहे का, किंवा काही स्फोटक आहे का, हे कॅमेरा लगेच कळवेल. हे कॅमेरे ठराविक अंतरावरून संशयास्पद वस्तू ओळखू शकतात, ज्यामुळे लोको पायलट वेळेवर आपत्कालीन ब्रेक लावू शकेल.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, AI कॅमेरे आणि आपत्कालीन ब्रेक यांना जोडण्यासाठी देखील संशोधन सुरू आहे. यामुळे अशा परिस्थितीत आपत्कालीन ब्रेक आपोआप लागू होतील आणि ट्रेन थांबवता येईल. यामुळे अपघात होण्याची शक्यता जवळपास शून्यावर जाईल.