TRENDING:

Ishan kishan : फायनलसाठी येताना बहिणीचा अपघतात मृत्यू, दु:खाचा डोंगर वाहून खेळला ईशान किशन! म्हणाला 'मी पांड्याशी बोललो अन्...'

Last Updated:

Ishan kishan On sister Accidental Death : ईशान किशन याच्या चुलत बहिणीचा मृत्यू झाला आहे. अपघातात तिचा अन् मेहुण्यांचं निधन झालं. त्यावर इशानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ishan kishan sister Accidental Death : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनल खेळवली गेली. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत पुन्हा एकदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. मात्र, याचवेळी इशान किशनवर दु:खाचा डोंगर कोसळला. मॅचसाठी अहमदाबादसाठी येत असताना ईशान किशन याच्या चुलत बहिणीचा मृत्यू झाला आहे. अपघातात तिचा अन् मेहुण्यांचं निधन झालं. त्यावर इशानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
Ishan Kishan said lost my cousin sister in car accident
Ishan Kishan said lost my cousin sister in car accident
advertisement

मी हार्दिक पांड्याशी बोललो अन्...

फायनलच्या अगदी आधी मी माझ्या चुलत बहिणीला कार अपघातात गमावलं, ज्यामुळे मी खुप दु:खी होतो. मी तिच्यासाठी खेळलो, याची कल्पना मी हार्दिक पांड्याला दिली. मी हार्दिक पांड्याशी बोललो आणि त्यांनी संघाला पुढे ठेवण्यास सांगितलं. मी हा विजय मी माझ्या बहिणीला समर्पित करतो आणि आज महिला दिन आहे, त्यामुळे तो अधिक खास बनतो, असं इशान किशन म्हणाला.

advertisement

advertisement

अनर्थ हो गया. हम लोग...

इशान किशनचे वडील वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी येणार होते पण मॅच पाहण्यासाठी येत असताना इशानच्या चुलत बहिणीच्या कारचा अपघात झाला. त्याच त्याचा भाचा आणि भाची थोडक्यात बचावले. "अनर्थ हो गया. हम लोग बहुत बडी मुसीबत में हैं' असं इशान किशनच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं. या अपघातामध्ये इशान किशनची चुलत बहिण आणि मेहुण्यांचं निधन झालं. चमत्कारिकरित्या या अपघातामध्ये जोडप्याची सहा महिने आणि 3 वर्षांची दोन मुलं वाचली. 'आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. इशानला त्यांना भेटायला जायचं होतं, पण फायनलमुळे तो परत येऊ शकला नाही. तो पूर्णपणे अस्वस्थ आहे,' असं प्रणव पांडे म्हणाले आहेत.

advertisement

हिमतीने खेळ दाखवला अन्

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

दरम्यान, मुलाचा खेळ पाहण्याऐवजी इशान किशनचे वडील सिलिगुडीतील एका शवगृहात बसले होते. या अपघातामध्ये जोडप्याची सहा महिने आणि 3 वर्षांची दोन मुलं वाचली. 'आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, इशानने हिंमत हारली नाही अन् त्याने हिमतीने खेळ दाखवला अन् टीम इंडियाला विजयाच्या जवळ देखील नेलं.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ishan kishan : फायनलसाठी येताना बहिणीचा अपघतात मृत्यू, दु:खाचा डोंगर वाहून खेळला ईशान किशन! म्हणाला 'मी पांड्याशी बोललो अन्...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल