TRENDING:

76 जवान झाले होते शहीद, 1 कोटीचंं बक्षीस असलेला जहाल माओवादी बसवा राजू अखेर मेला!

Last Updated:

छत्तीसगडमधील नारायणपूर इथं ५० तासांहून अधिक काळ चाललेल्या मोठ्या माओवाद्याविरोधी मोहिमेत बसव राजू मारला गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायपूर :  छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला.  अबुझहमाडच्या जंगलात झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ माओवाद्यांना ठार मारलं आहे. परिसरात शोध घेतल्यानंतर २६ मृतदेह आणि शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत  माओवादी कमांडर बसवा राजू देखील मारला गेला आहे.  बसवा राजूवर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं. बसवा राजू हा नंबाला केशव राव उर्फ ​​बसवा राजू उर्फ ​​गगन्ना उर्फ ​​प्रकाश या नावाने देखील ओळखला जात होता. त्याने बी.टेक.चे शिक्षण घेतलं होतं. त्याला औषधशास्त्राचे चांगलं ज्ञान होतं. बसवा हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जिआन्नापेट गावचा रहिवासी होता.
News18
News18
advertisement

छत्तीसगडमधील नारायणपूर इथं ५० तासांहून अधिक काळ चाललेल्या मोठ्या माओवाद्याविरोधी मोहिमेत बसव राजू मारला गेला. विजापूरच्या करेगुट्टा इथं सीआरपीएफचे डीजी जीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी ही कारवाई केली होती.  या कारवाईत जवानांना मोठं यश  मिळालं. पण या कारवाईत वरिष्ठ माओवादी नेते बचावले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण होता बसव राजू?

advertisement

बसवा राजू हा एक क्रुर  माओवादी होता. तो सीपीआय (माओवादी) चा सर्वोच्च कमांडर होता. तो माओवादी संघटनेचा थिंक टँक असंही म्हटलं जात होता. २०१८ मध्ये, माओवादी नेता गणपतीने आपल्यापदाचा राजीनामा दिला. राजूने त्याची जागा घेतली. बसव राजूने सैनिकांवर अनेक हल्ले करण्याची योजना आखली. तो अनेक सैनिकांच्या हौतात्म्यासाठी जबाबदार आहे. तो आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी होता. विद्यार्थीदशेपासूनच त्याने डाव्या विचारसरणीच्या कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. रॅडिकल स्टुडंट्स युनियन (RSU) चा सदस्य होता. हळूहळू तो सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस पदापर्यंत पोहोचला. एनआयएसोबतच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीतही त्याचा समावेश होता.

advertisement

माओवादी चळवळीसाठी बसवा राजू किती महत्त्वाचा होता?

माओवादी कमांडर बसवा राजू हा अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता. २००३ मध्ये अलिपिरी बॉम्ब हल्ल्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१० मध्ये त्याने दंतेवाडा येथे एका हल्ल्यात घातपात घडवून आणला. या हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान शहीद झाले. त्याने एमटेक पर्यंत शिक्षण घेतलं. तो गनिमी युद्ध आणि आयईडी लावण्यात खूप कुशल होता. राजूबद्दल जाणून घेतल्यानंतर, माओवादी संघटनेत नेतृत्वाचा अभाव स्पष्टपणं दिसून येईल. तो माओवादी संघटनेचा थिंक टँक समजला जात होता त्याने अबुझहमद परिसरात राज्य केलं. आता त्याच्या मृत्यूनंतर तरुण संघटनेपासून दूर जातील. या यशस्वी कारवाईद्वारे उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला, असं सुरक्षा अधिकाऱ्यांचं मत आहे. आता, यामुळे उर्वरित केडरमध्येही फूट पडू शकते.

advertisement

१ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या बसवा राजू ठार झाल्यानंतर उर्वरित माओवादी नेते आता सैनिकांच्या निशाण्यावर आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुप्पला लक्ष्मण राव, ज्यांना गणपती, रामण्णा, श्रीनिवास आणि शेखर असंही म्हणतात. त्याचं वय अंदाजे ७४ वर्षे आहे. तो सीपीआय (माओवादी) चा सल्लागार आहे. अबुझमद परिसरात हे दल सतत कारवाई करत आहे. येत्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारवाया होतील.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
76 जवान झाले होते शहीद, 1 कोटीचंं बक्षीस असलेला जहाल माओवादी बसवा राजू अखेर मेला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल