TRENDING:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट, देशांच्या द्विपक्षीय संबंधांची एक नवी सुरुवात

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेममध्ये इसाक हर्झोग यांची भेट घेऊन भारत-इस्रायल संबंध, शांतता, नवोन्मेष, सुरक्षा आणि Gaza Peace Plan वर चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये इस्रायलचे राष्ट्रपती महामहीम इसाक हर्झोग यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी 2017 मधील आपला इस्रायल दौरा आणि 2023 मधील दुबई दौऱ्याच्या वेळी राष्ट्रपती हर्झोग यांच्यासोबत झालेल्या मागील भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. भारत – इस्रायलमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले असून, ते आता शांतता, नवोन्मेष आणि समृद्धीसाठी विशेष धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले असून, ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांची एक नवी सुरुवात असल्याची दखलपूर्ण नोंद दोन्ही नेत्यांनी या भेटीत घेतली. यातून दोन्ही देशांमधील दृढ विश्वास, सामायिक लोकशाही मूल्ये आणि विशेष मैत्रीचे प्रतिबिंबही उमटत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापार आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उपक्रम, संरक्षण आणि सुरक्षा, तसेच दहशतवादविरोधातील लढा या क्षेत्रांमधील विद्यमान सहकार्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
News18
News18
advertisement

यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता आराखड्याला (Gaza Peace Plan) आपला पाठिंबा दर्शवला. पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीबद्दल समाधानही वाटत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पर्यावरणीय जतन-संवर्धनाच्या बाबतीत दोन्ही देशांमधील सामायिक मूल्यांचे प्रतीक म्हणून, एका विशेष पुढाकार घेत पंतप्रधानांनी राष्ट्रपती हर्झोग आणि इस्त्रायलच्या प्रथम महिला यांच्यासोबत तिथल्या राष्ट्रपती उद्यानात एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांगा कसं जगायचं? कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, विक्रीनंतर हातात काहीच नाही!
सर्व पहा

राष्ट्रपती हर्झोग यांची सोहार्दपूर्णता, त्यांचे आदरातिथ्य तसेच त्यांनी भारत आणि इस्रायलमधील भागीदारीला दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपतींची भेट, देशांच्या द्विपक्षीय संबंधांची एक नवी सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल