TRENDING:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील इटी नाऊ जागतिक व्यवसाय शिखर परिषदेची क्षणचित्रे सामाइक केली

Last Updated:

नरेंद्र मोदी यांनी इटी नाऊ जागतिक व्यवसाय शिखर परिषदेत भारताच्या अभूतपूर्व प्रगतीवर, लोकशाही बळकटीवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील इटी नाऊ जागतिक व्यवसाय शिखर परिषदेची क्षणचित्रे सामाइक केली. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि ‘अडथळ्यांचे दशक, बदलाचे शतक’ या परिषदेच्या संकल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले.
News18
News18
advertisement

21 व्या शतकाच्या गेल्या दशकात जागतिक साथ, तणाव आणि विविध भागांत सुरू झालेली युद्धे तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे बिघडलेले जागतिक संतुलन अशा अभूतपूर्व संकटांचा सामना जगाने केला या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. संकटांच्या काळातच देशाची खरी ताकद कळते असे सांगून या संकटांमधून मार्ग काढत भारताने या दशकात उल्लेखनीय प्रगती केली, उत्कृष्ट कामगिरी केली आणि लोकशाहीदेखील बळकट केली असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भारत जगाच्या विकासाला दिशा देईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नवे इंजिन म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

advertisement

एक्स या समाज माध्यमावरील संदेशांमध्ये मोदी म्हणतात,

“अनेक अडचणींच्या काळातही हे दशक भारतासाठी अभूतपूर्व विकासाचे दशक ठरले. अडचणींवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि उत्कृष्ट कामगिरी यामुळे आपली लोकशाही बळकट झाली. 21 व्या शतकाच्या या दशकामध्ये भारत सुधारणांच्या वारुवर स्वार झाला आहे.”

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

“आम्ही अर्थसंकल्पात केवळ आराखडा मांडण्यावर भर दिला नाही; तर परिणाम केंद्रित अर्थसंकल्प तयार केला. गेल्या दशकात आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे विकासाला दिशा देणारे प्रमुख घटक म्हणून पाहिले. आज आपण जगातल्या विविध देशांबरोबर व्यापार करार करत आहोत; कारण आज भारताकडे आत्मविश्वास आहे आणि भारत जगाशी स्पर्धा करायला सज्ज आहे.”

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील इटी नाऊ जागतिक व्यवसाय शिखर परिषदेची क्षणचित्रे सामाइक केली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल