TRENDING:

सरकारी शिष्यवृत्तीमुळे OBC विद्यार्थ्यांचं परदेशातील शिक्षणाचं स्वप्न होतंय पूर्ण, 75 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ, लाभार्थ्यांनी मानले सरकारचे आभार

Last Updated:

सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेतून 75 विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी निवडण्यात आले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं परदेश शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती अन् भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सरकारने लागू केली आहे. यंदा तब्बल 75 ओबीसी विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत.
News18
News18
advertisement

येत्या वर्षात ही संख्या आणखी वाढविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे या निर्णयाने ओबीसी समाजात समाधान व्यक्त होत आहे. ओबीसी समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांची ही इच्छापूर्ती करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सरकारने परदेशी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली.

advertisement

हे ही वाचा : लग्नाआधी कुंडली का जुळवली जाते?, मंगळदोष फायदेशीर?, महत्त्वाची माहिती

तब्बल 75 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय 30 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. या अर्जांची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणेचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी केली. अर्जातील त्रुटींची विद्यार्थ्यांकडून पूर्तता करून शाखा आणि अभ्यासक्रमनिहाय ‘वर्ल्ड क्यूएस रँकिंग’ तयार केली.

advertisement

हे ही वाचा : Youtube Ad वर क्लिक करत असाल तर सावधान! डॉक्टरला 76 लाखांचा चुना

संबंधित यादी राज्य सरकारला सादर केली. ही क्रमवारी लक्षात घेऊन 75 पात्र विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. 26 सप्टेंबरला ही यादी महायुती सरकारने मंजूर केली. यासोबतच शासनामार्फत परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यानंतर देशाची सेवा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशी हमी या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचे स्वप्नपूर्ती करतानाच देशसेवेसाठीची एक सक्षम फळीच तयार केल्याची भावना आहे.

advertisement

हे ही वाचा : फितुरी आणि धोकेबाजी करणाऱ्यांना शिवजन्मभूमी साथ देणार नाही, शरद पवारांचा अतुल बेनरेंवर वार

या शिष्यवृत्तीचे लाभार्थी रोहित सुरेश दिवसे यांनी सांगितले की, "मी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी गावचा रहिवासी आहे. ओबीसी परदेश शिष्यवृत्तीच्या मदतीने युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहममध्ये ‘मास्टर इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’ करीत आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मला ही शिष्यवृत्ती मिळाली. माझासारखे आणखी 75 विद्यार्थी ही शिष्यृवत्ती घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत. ही शिष्यवृत्ती मिळाली नसती तर कदाचित मला माझे शिक्षणही पूर्ण करता आले नसते. साधारणत: 50 लाखांच्या खर्चाचा विचारही शक्य नव्हता. काही विद्यार्थ्यांसाठी तर एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च सरकार या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून करीत आहे. ही समाजासाठीची मोठी उपलब्धी आहे."

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/करिअर/
सरकारी शिष्यवृत्तीमुळे OBC विद्यार्थ्यांचं परदेशातील शिक्षणाचं स्वप्न होतंय पूर्ण, 75 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ, लाभार्थ्यांनी मानले सरकारचे आभार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल