किती किलो वजनाचे नेता येणार?
आता रेल्वे प्रवास करताना सामानाचेही पैसे मोजावे लागणार आहे. सामानांचं वजन करण्यासाठी इलेक्ट्राॅनिक वजन यंत्रं बसवण्यात येणार आहेत. ठरवून दिलेल्या नियमानुसार जास्त वजन असेल तर दंड आकाराला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर आणि अलीगढ येथे हा नियम लागू होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील माहिती आणि प्रसिद्ध विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी स्पष्ट केलेले आहे.
advertisement
सामानाचे वजन करण्याचा नियम अगोदरच होता. पण तो काटेकोरपणे पाळला जात नव्हता. आता त्याच्या जास्त लक्ष दिले जाणार आहे. प्रवासी वर्गानुसार सामान नेण्याची मर्यादा निश्चित केलेली आहे. फक्त वजनच नाही, तर सामाचा आकारही निश्चित केला जाणार आहे.
यामध्ये साधारणपणे ट्रंक, सुटकेस किंवा बाॅक्सचा आकार 100 सेमी x 60 सेमीपेक्षा जास्त नसावा. त्यापेक्षा मोठी असेल ब्रेक व्हॅनने ते सामान पाठवावे लागणार आहे. त्याचे 30 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांनी या नव्या नियमाची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार आपले सामान न्यावे. प्रवास करताना प्रवासी वर्गानुसार खालील वजनाचे साहित्य मोफत नेऊ शकाल. पण यापेक्षा जास्त वजन भरल्यास जास्त शुल्क आकारलं जाणार आहे.
- जनरलमध्ये 35 किलो
- स्लीपरमध्ये 40 किलो
- एसी थ्री मध्ये 40 किलो
- एसी टू मध्ये 50 किलो
- एसी फर्स्टमध्ये 70 किलो
या वयाच्या मुलांनाही हा नियम लागू
5 ते 12 वयोगटातील मुलांना सामानाचा नियम लागू आहे. पण त्यामध्ये अर्ध्या रकमेची सूट देण्यात आली आहे. 50 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या कोणालाही घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हे ही वाचा : IT park: कोल्हापूरात 'आयटी पार्क' होणार, कंपन्या येण्यास तयार, 'या' महामार्गावर उद्योग विभाग शोधतंय जागा
हे ही वाचा : सरकारी नोकरीच्या जाळ्यात फसले अन् 31 लाख गमावून बसले; या 2 घटना ऐकून पोलिसही चक्रावले!