सरकारी नोकरीच्या जाळ्यात फसले अन् 31 लाख गमावून बसले; या 2 घटना ऐकून पोलिसही चक्रावले!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: भारती विद्यापीठात 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची आणि सार्वजनिक बांधकाम विभागात 'सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट'ची सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत...

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar: भारती विद्यापीठात 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची आणि सार्वजनिक बांधकाम विभागात 'सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट'ची सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत 31 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंजाजी प्रभाकर वरकड (वय-33, रा. जय भवानीनगर, सिडको) यांनी तिघांविरोधात तक्रार दिली आहे. प्रभावती सखाराम वाघ, पांडुरंग साबळे आणि संतोष कुमार शर्मा या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पहिलं प्रकरण 'असं' घडलं
मुंजाजी वरकड हे बँकेच नोकरी करतात. त्यांचा आतेमामा दत्ता भाऊराव ताटे यांचा 'दत्ता रोडलाइन्स'चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुंजाजी वरकड यांचे चुलते राजेभाऊ वरकड यांची ताटे यांच्या ऑफिसमध्ये आरोपी प्रभावती वाघ आणि पांडुरंग साबळे यांच्याशी भेट झाली. चर्चेमधून कळलं की, हे दोघेजण सरकारी नोकरी लावून देण्याचं काम करतात. राजेभाऊंनी आपल्या मुलासाठी म्हणजेच इंद्रजितसाठी सरकारी नोकरीच्या शोधात होते.
advertisement
30 लाख रुपयांत भारती विद्यापीठात 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची नोकरी लावून देतो, असे या 2 आरोपींना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून इंद्रजितने 19 लाख आणि दत्ता ताटे यांनी 9 लाख, अशी एकूण 28 लाखांची रक्कम प्रभावती यांच्या खात्यात पाठवली. यावेळी आरोपींनी इंद्रजितला 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची खोटी नियुक्ती ऑर्डरही दाखवली.
दुसरं प्रकरण 'असं' घडलं
इंद्रजितच्या प्रकरणानंतर मुंजाजी वरकड यांनी 2023 मध्ये आरोपींची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागात 'सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट'ची सरकारी नोकरी लावून देतो, त्यासाठी 30 लाख रुपये लागतील. मुंजाजीनेही लगेचच 3 लाख रुपये आरोपींच्या खात्यात पाठवले. त्यानंतर आरोपींनी मुंबई मंत्रालयात मुंजाजीला बोलावून घेतले आणि तिथे संतोष कुमार शर्मा यांची भेट घालून दिली. तिथे शर्माने खोट्या नियुक्ती पत्रावर मुंजाजीचीसही करून घेतली आणि उर्वरित 27 लाख दिल्यावर कामावर रुजू करून घेण्याचे आरोपींना आश्वासन दिले. पण, मुंजाजीला शंका आली, त्याने सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी तेव्ही नियुक्तीची ती ऑर्डर खोटी असल्याचे निदर्शनास आले.
advertisement
पुढे काय झालं? 
दोन्ही प्रकरणात खोट्या ऑर्डर्स असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंजाजी, इंद्रजित आणि दत्ता ताटे या तिघांनी आरोपींकडे दिेलेल्या 31 लाख रकमेची मागणी केली. आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. पण नंतर आरोपी प्रभावती यांनी बुलढाण्यातील आईच्या नावावरची जमीन विकून रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र ती जमीन अगोरदच विकल्याचे समोर आले. यामुळे मुंजाजी वरकड यांनी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सरकारी नोकरीच्या जाळ्यात फसले अन् 31 लाख गमावून बसले; या 2 घटना ऐकून पोलिसही चक्रावले!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement