Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Crime News: अंबाजोगाईतील हाॅटेलमध्ये दारू पित बसलेल्या तिघा मित्रांमधील दोघांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेला आणि एकाने दुसऱ्या मित्रावर...
Chhatrapati Sambhajinagar : हाॅटेलमध्ये दारू पित बसलेल्या तिघा मित्रांमधील दोघांच्यात पैशांवरून भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेला आणि एकाने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप वार करून जागीच संपवले. ही घटना अंबाजोगाईतील एका हाॅटेलात घडली. अविनाश शंकर देवकर (वय-35) असे या मृत तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अविनाशच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणातील आरोपी स्वराज कारभार पौळ याला अवघ्या 6 तासांत पोलिसांनी अटक केली.
पैशांच्या वाद सुरू झाला आणि मित्रावर कोयत्याने वार केला
समोर आलेली माहिती अशी की, अंबाजोगाईतील एका हाॅटेलमध्ये अविनाश, स्वराज आणि सलमान मुस्तफा शेख हे तिघेजण दारू पित बसले होते. त्याचवेळी अविनाश आणि स्वराद यांच्यामध्ये पैशांवरून जोरदार भांडण सुरू झाले. वाद टोकाला गेल्यानंतर अविनाश बाजूच्या केबिनमध्ये गेला, त्याचवेळी स्वराजने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, अविनाशचा जागीच मृत्यू झाला. मृत अविनाशवरही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
advertisement
पुण्याला पळून निघालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
यावेळी सलमानने दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात तोही जखमी झाला. या घटनेनंतर सलमानने पोलिसांना त्वरित माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सीडीआरच्या मदतीने आरोपी स्वराज माग काढला. तर तो लातूरमधून पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
हे ही वाचा : संभाजीनगरात बीटेकच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, अश्लील VIDEO काढत बळजबरी लग्नही केलं अन्...
हे ही वाचा : Kolhapur News: गरीब महिलेला दाखवलं पैशांचं आमिष, 'त्या' लाॅजवर सुरू झालं भलतंच, पोलिसांना मिळाली टिप अन्...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!


