Kolhapur News: गरीब महिलेला दाखवलं पैशांचं आमिष, 'त्या' लाॅजवर सुरू झालं भलतंच, पोलिसांना मिळाली टिप अन्...

Last Updated:

Kolhapur News: गडहिंग्लज शहरातील गणेश लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. तिथे एका गरीब महिलेला...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News: गडहिंग्लजमधील गणेश लाॅजमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला. लाॅजमध्ये एका गरीब महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं जात होतं. यामध्ये लाॅज मालकासहीत तिघांवर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अचानक टाकला छापा
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गडहिंग्लज शहरातील गणेश लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. तिथे एका गरीब महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची प्राथमिक माहिती होती. माहिती मिळताच गडहिंग्जल आणि इचरकरंजी पोलिसांनी संयुक्तपणे गणेश लाॅजवर छापा टाकला.
लाॅज मालकासह चौघे आरोपी
या कारवाईत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. लाॅज मालक अशोक भीमराव गवळी (वय-66, तोरगल्ली, महालक्ष्मी मंदिराजवळ, गडहिंग्लज), मारुती बाळकू पाटील (वय-22, जक्कनहट्टी, ता. चंदगड), सागन अभिमन्यू मांग (वय-38, रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) आणि मंजुनाथ सुरेश काळाई (वय-40, मुत्नाळ, ता. गडहिंग्लज), अशी आरोपींची नावे आहेत.
advertisement
यासंदर्भात पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, अपनिरीक्षक पल्लवी पोवार, हेडकाॅन्स्टेबल किल्लेदार, दादू खोत, इचलकरंजीतील शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून गणेश लाॅजवर छापा टाकण्याची कारवाई केली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Kolhapur News: गरीब महिलेला दाखवलं पैशांचं आमिष, 'त्या' लाॅजवर सुरू झालं भलतंच, पोलिसांना मिळाली टिप अन्...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement