संभाजीनगरात बीटेकच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, अश्लील VIDEO काढत बळजबरी लग्नही केलं अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका बी.टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका बी.टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडितेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर मोबाईलमधील अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत बळजबरीने लग्न केले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयडीसी वाळूज परिसरात ही घटना घडली. ऋतिक सांडू सलामपुरे (वय २३) असे अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे. ऋतिकने बी.टेकच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
आरोपी ऋतिक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत बळजबरीने तिच्याशी लग्न केलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तिघांवर गुन्हा दाखल
पीडितेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी ऋतिक सांडू सलामपुरे याच्यासह अन्य दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. बीटेकचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अशाप्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 28, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरात बीटेकच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, अश्लील VIDEO काढत बळजबरी लग्नही केलं अन्...