नियतीचा क्रूर खेळ! आधी वडील, आता आई अन् भाऊही गेला; 14 वर्षांच्या मुलगी झाली अनाथ, पण शेतात नेमकं घडलं काय?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Nagpur News: माय-लेक आणि मजूर महिला शेतात काम करत होते. अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिघेही एका झाडाखाली थांबले. इतक्यात वीज...
Nagpur News: शेतात काम करणाऱ्या माय-लेकासह मजूर महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सावनेर पोलीस ठाणाच्या हद्दतील धापेवाडाजवळ असणाऱ्या मडासावंगी येथे घडली. 42 वर्षांच्या वंदना प्रकाश पाटील, त्यांचा 22 वर्षांचा मुलगा ओम प्रकाश पाटील आणि त्यांच्यासोबत शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या 63 वर्षांच्या निर्मला पराते, अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
तिघांचा जागीच होरपळून मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार माय-लेक आणि मजूर महिला शेतात काम करत होते. अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिघेही एका झाडाखाली थांबले. इतक्यात वीज कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. शेजारच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी या माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर सावनेर पोलिसांत माहिती देण्यात आली.
मागच्या वर्षी वडिलांचाही झाला होता मृत्यू
दुर्दैवाची गोष्ट ही की, मागच्या वर्षी ओमच्या वडिलांना बैलाने लाथ मारली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे माय-लेक 2 एकर शेतात काम करून कुटुंबाचा आपलं पोटपाणी भरत होते. मात्र, यावेळी काळाने दोघांना गाठलं. या कुटुंबात ओमची 14 वर्षांची बहीण संस्कृती एकटीच आहे. आईच्या आणि भावाच्या जाण्याने जबरदस्त धक्का बसला आहे.
advertisement
हे ही वाचा : Kolhapur News: गरीब महिलेला दाखवलं पैशांचं आमिष, 'त्या' लाॅजवर सुरू झालं भलतंच, पोलिसांना मिळाली टिप अन्...
हे ही वाचा : Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
नियतीचा क्रूर खेळ! आधी वडील, आता आई अन् भाऊही गेला; 14 वर्षांच्या मुलगी झाली अनाथ, पण शेतात नेमकं घडलं काय?


