IT park: कोल्हापूरात 'आयटी पार्क' होणार, कंपन्या येण्यास तयार, 'या' महामार्गावर उद्योग विभाग शोधतंय जागा
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
IT park: कोल्हापूरात आयटी पार्क व्हावा, यासाठी 12 वर्षांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्ककरिता जागेचा शोध घेतला जात...
Kolhapur News: कोल्हापूरात आयटी पार्क व्हावा, यासाठी 12 वर्षांपासून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्ककरिता जागेचा शोध घेतला जात आहे. 2024 मध्ये शेंडा पार्कातील कृषी खात्याची 30 एकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ती जागा अपुरी पडण्याची शक्यता असल्यामुळे उद्योग विभागाने आता कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत जागा पाहण्यास सुरूवात केली आहे.
कोल्हापूरात 350 आयटी कंपन्या
पुणे आणि बंगळुरू ही शहरं आयटी हब आहेत. या 2 शहरांच्यामध्ये कोल्हापूर आहे. येथे 350 हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत आहेत. वर्षांला सुमारे 300 कोटींपेक्षा जास्त साॅफ्टवेअरची निर्यात कोल्हापूरातून होते. त्यामुळे अनेक कंपन्यांना कोल्हापूराचं महत्त्व कळलं आहे, त्यांनी कोल्हापूरात यायची तयारी दर्शविली आहे. पण त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.
advertisement
...म्हणून तरुणांना जावं लागतंय बाहेर
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत आयटी पार्कसाठी जागा शोधण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. कोल्हापूरात आयटी पार्क व्हावा, अशी मागणी 12 वर्षांपासून केली जात आहे. कारण मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद याठिकाणी कोल्हापूर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मुलं आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. कोल्हापूरात आयटी पार्क नसल्याने त्यांना या शहरांमध्ये जावं लागत आहे.
advertisement
मिळालेली जागा पडतेय अपुरी
या तरुणांना कोल्हापूरातच रोजगार मिळावा, त्यांच्यावर शहराबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आयटी पार्क व्हावा, अशी मागणी आहे. पार्कसाठी अनेक ठिकाणी जागेचा शोध घेतल्यानंतर शेंडा पार्कातील कृषीची 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची कृषी, उद्योग आणि महसूल विभागात प्रक्रियाही सुरू आहे. पण ही जागा विस्तारीकरणासाठी अपुरी पडणार आहे. अशावेळी बाहेर येणाऱ्या कंपन्यांना कुठे जागा द्यायची, हा प्रश्न आहे. त्यामुळे उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत जागा शोधण्याचा काम सुरू केलं आहे.
advertisement
हे ही वाचा : Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
हे ही वाचा : Konkan Railway: दसरा-दिवाळी अजून दूर, पण रेल्वे आरक्षण आत्ताच फुल्ल; प्रवाशांना येतोय 'रिग्रेट'चा मेसेज
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IT park: कोल्हापूरात 'आयटी पार्क' होणार, कंपन्या येण्यास तयार, 'या' महामार्गावर उद्योग विभाग शोधतंय जागा