Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?

Last Updated:

ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये कोल्हापूरकरांना नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पाइपलाइनमध्ये वारंवार बिघाड होत...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये कोल्हापूरकरांना नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पाइपलाइनमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे ए. बी. वाॅर्डासहीत उपनगरातील लोकांना पाण्यासाठी टॅंकरच्या मागे पळण्याची वेळ आलेली आहे. काळम्मावाडीतून आणलेल्या थेट पाइपलाइनमध्ये कोल्हापूरातील पाणीटंचाई दूर होईल, असं आश्वासन प्रशासानाने दिलं होते. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. गणपतीच्या आगमनादिवशीदेखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.
पाण्यासाठी कोल्हापूरकरांची वणवण
शहर आणि उपनगराला काळम्मावाडीतून आणलेल्या पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होेते. पण काळम्मावाडी पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्यामुळे 3 दिवसांपासून कोल्हापूरकरांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. सणासुदीच्या दिवसांमध्ये पाण्याची बोंबाबोंब झाल्यामुळे मध्यरात्रीपासून पाण्यासाठी जागे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचा वाढता रोष पाहून महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गणपतीच्या आगमनादिवशीही असाच प्रकार घडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले.
advertisement
नागरिकांनी प्रशासनावर व्यक्त केली नाराजी
बालगोपाळ तालीम, शाहू मैदान, वेताळ तालीम, बापूरामनगर, गंजीमाळ, प्रथमेशनगर, कळंबा रिंगरोड आणि ए.बी वाॅर्ड या ठिकाणी पाण्याचा पुरवठा पुरेशा दाबाने न झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये बिघाड झाला असेल तर त्वरित दुरूस्त करून तो सुरळीत करण्यात प्रयत्न महापालिकेने करायला हवा. पण प्रशासनाकडूनच बिघाड होण्यापूर्वी काळजी का घेतली जात नाही, असा सवाल आता नागरिक करत आहेत. महापालिकेने कळंबा फिल्टर हाऊसमधून 20 टँकरची व्यवस्था करून सायंकाळपर्यंत 40 फेऱ्या मारल्या. बावडा फिल्टरमधून 12 टँंकरच्या 30 फेऱ्या मारल्या आहेत.
advertisement
पालिका प्रशासन करतंय काय?
काळम्मावाडी पंपात व्हीएफडी कार्ड खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारी रात्री तिसऱ्या टेस्टिंगमध्ये एरर काढून टाकला होता. पण बुधवारी पुन्हा पहाटे चौथ्या टेस्टिंगमध्ये एरर आला. त्यामुळे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पुणे महापालिकेचे प्रशासन नवल किशोल राम यांच्याशी संपर्क साधला आणि पुणे महापालिकेकडून क्रोबार असेंबली किट मागवले. त्याचे काळम्मावाडी पंपात बुधवारी रात्री फिटिंग सुरू होते.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement