Sangli News: वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षाविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या तक्रारीने खळबळ

Last Updated:

शंकर माने याने कुपवाड येथे रहिवासी असलेल्या 39 वर्षीय एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

Shankar Mane
Shankar Mane
सांगली :  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने (रा.कवठेमहांकाळ) याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचा बलात्कार केल्याचा गुन्हा करण्यात आला आहे. त्यांच्यासह माने याच्या कुटुंबातील आई, पत्नी, भाऊ असे अन्य तीन जणांवर महिलेस मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 39 वर्षीय पीडित महिलेने कवठेमहांकाळ पोलिसात बलात्कार व मारहाण करल्याची तक्रार दाखल केली असून कवठेमहांकाळ पोलिसांनी शंकर माने यांना बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शंकर माने याने कुपवाड येथे रहिवासी असलेल्या 39 वर्षीय एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 2007 सालापासून 23 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या काळात संबंध होते. तसेच माने याच्यापासून एक अपत्य ही प्राप्त झाले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ही घटना 2007 सालापासून 23 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या काळात वारंवार घडली आहे.
advertisement

कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल

गेल्या आठवड्यात शंकर माने यांच्या कार्यालयात पीडित महिला आणि तिचा मुलगा कागदपत्राची मागणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शंकर माने यांच्यासह आई शोभा मार्तंड माने,भाऊ सिद्धू मार्तंड माने,पत्नी सविता शंकर माने या तिघांनी मारहाण केल्याचेही पीडित महिलेने कवठेमहांकाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli News: वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षाविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या तक्रारीने खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement