Konkan Railway: दसरा-दिवाळी अजून दूर, पण रेल्वे आरक्षण आत्ताच फुल्ल; प्रवाशांना येतोय 'रिग्रेट'चा मेसेज
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Konkan Railway: रेल्वे प्रवाशांकडून 60 दिवस आधीच तिकीट बुकिंग करण्याची सुविधा रेल्वे प्रशासन उपलब्ध करून दिलेली आहे. दसरा-दिवाळी अजून बरेच दिवस आहेत. त्याधीच...
Konkan Railway: रेल्वे प्रवाशांकडून 60 दिवस आधीच तिकीट बुकिंग करण्याची सुविधा रेल्वे प्रशासन उपलब्ध करून दिलेली आहे. दसरा-दिवाळी अजून बरेच दिवस आहेत. त्याधीच मुंबई मार्गावरील बहुतेक गाड्यांचा आरक्षण आत्ताच पूर्ण झाले आहे. प्रवाशांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केला असता, वेबसाईटवर 'वेटिंग' किंवा 'रिग्रेट'चा मेसेज येत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून ज्यादा गाड्यांची मागणी केली जात आहे.
प्रवाशांची चांगलीच चढाओढ
शहराकडे कामानिमित्त आणि शिक्षणासाठी बरेच प्रवासी-विद्यार्थी सुटीच्या काळात घरी जात असतात. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचा चांगलीच गर्दी असते. दसरा-दिवाळीच्या काळात तर प्रवाशांची संख्या तर मोठी असते. रेल्वेगाड्यांमध्ये त्यावेळी चढाओढ मोठी असते. याच कालावधीत पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांची आरक्षणे फुल्ल होतात.
advertisement
प्रवाशांना येतोय 'रिग्रेट'चा मेसेज
कोकण रेल्वेने तीन-चार महिन्याआधीच तिकीट बुक करण्याचा नियम केला आहे. मात्र तिकीट बुक करत असताना अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल होत असतात. रेल्वेच्या अघिकृत वेबसाईटवर तिकीट बुक करताना वेटिंग लिस्टशिवाय रिग्रेटचाही मेसेज येत आहे.
रेल्वेचा नवीन नियम काय सांगतो?
रेल्वेचे तिकिट नव्या नियमानुसार 60 दिवस आधीच बुक करता येते. पूर्वी ही मुदत 120 दिवसांची होती. एका प्रवाशाला एकाच पीनआरवर 6 तिकिटं बुक करता येतात. ऑनलाईन बुक करत असताना ओटीपी आणि ओळपत्राची गरज असते. हा नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
advertisement
हे ही वाचा : मुलगा सौदागरकडून आईच्या जीवाचा सौदा, पत्नीसोबत मिळून हालहाल करून मारलं, धाराशिवमधील अमानुष घटना!
हे ही वाचा : Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan Railway: दसरा-दिवाळी अजून दूर, पण रेल्वे आरक्षण आत्ताच फुल्ल; प्रवाशांना येतोय 'रिग्रेट'चा मेसेज


