लोकलमधील 'त्या' धक्क्याने घात केला
रितेश राकेश येरूणकर असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रितेश हा बदलापूर पूर्वेतील आनंदनगर परिसरात राहत असून नवी मुंबईतील सीवुड्स दारावे येथील एका मॉलमधील कपड्याच्या दुकानात काम करत होता. 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजता त्याने ठाणे स्थानकावरून बदलापूरकडे जाणारी फास्ट लोकल पकडली होती.
advertisement
रेल्वेच्या माहितीनुसार, रात्री 11.45 वाजता ट्रेन अंबरनाथ स्थानकाच्या दिशेने येत असताना शेजारी बसलेल्या एका तरुणाने अचानक रितेशच्या हातातील मोबाईल खेचला. रितेशने याला विरोध केला असता आरोपीने त्याला जोरात धक्का दिला. क्षणातच रितेश धावत्या ट्रेनमधून खाली फेकला गेला.
खाली पडताना रितेशचा डावा पाय थेट ट्रेनच्या चाकाखाली आला. यात त्याच्या पायाचे तुकडे झाले. डोक्याला आणि चेहऱ्यालाही गंभीर दुखापत झाली असून डोळे सुजले आहेत. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे.
आरोपीला अटक
या प्रकरणी कल्याण जीआरपीने कैलाश बाळकृष्ण जाधव याला अटक केली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी लोकल ट्रेनमधील सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
