सिद्धिविनायक मंदिर येत्या 7 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत श्री गणेशाच्या मुर्तीवर सिंदूर लेपनाचा विधी केला जाणार आहे. या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष मुर्तीचे दर्शन मिळणार नाही. मंदिर बंद असण्याच्या कालावधीतच मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण विधी आटोपले जाणार आहेत. धार्मिक प्रक्रिया अत्यंत श्रद्धेने आणि विधीवत पद्धतीने पार पाडली जाते. सिंदूर लेपनाच्या काळात गाभार्यातील मूर्तीला हाताळणी आणि विधी सुरू असल्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन देता येणार नाही. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री गणेशाच्या फोटोचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
advertisement
जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून भाविकांना या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 7 जानेवारी ते 11 जानेवारी या पाच दिवसांमध्ये सिंदूर लेपनाचा विधी, स्वच्छता आणि संबंधित धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. सिंदूर लेपनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी विधीवत पूजा- अर्चा पार पडल्यानंतर आणि विशेष पूजेनंतर दुपारी 1 वाजता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. त्या वेळेपासून श्री सिद्धिविनायक गणपतीच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे.
