नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे अहिल्यानगर जिल्हा पुणे व नागपूर या महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडला जाणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी आठवड्यातील सहा दिवस (सोमवार वगळता) नागपूरहून पुण्याकडे धावेल तर मंगळवार वगळून इतर सहा दिवस पुण्याहून नागपूरकडे धावेल.
नागपूर पुणे वंदे भारतला हिरवा झेंडा, बुकिंग ते तिकीट दर, सगळी माहिती एका क्लिकवर
advertisement
नागपूरमधील अजनी स्थानकातून ही गाडी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने निघेल आणि संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर येईल. या ठिकाणी वंदे भारतचा दोन मिनिटांचा थांबा आहे. त्यामुळे 7 वाजून 37 मिनिटांनी ही गाडी पुण्याकडे मार्गस्थ होईल.
याउलट, पुण्याकडून नागपूरकडे निघणारी वंदे भारत सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी अहिल्यानगरला पोहचेल. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत ही नागपूरकडे निघेल. नगरच्या प्रवाशांना अवघ्या दोन मिनिटांत गाडी पकडावी लागणार आहे. या गाडीमुळे नगर ते पुणे हा प्रवास सुमारे 2 तासांत करता येणार आहे. अहिल्यानगर शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार जास्त आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे अशा प्रवाशांची सोय होणार आहे.