Agriculture Success: शेतकऱ्याचा नादच खुळा! 10 गुंठे शेती अन् 2 महिन्यात लखपती, पाहा काय केलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Cucumber Farming: सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतात वेगळे प्रयोग करत आहेत. सांगलीतील शेतकऱ्यानं चक्क सीडलेस काकडीची शेती केलीये.
advertisement
1/7

सध्याच्या काळात शेतीच्या क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग होत आहेत. शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक पिकांसोबतच तरकारी पिके देखील घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने असाच अनोखा प्रयोग आपल्या शेतीत केला आहे. शिराळा तालुक्यातील सागावचे शेतकरी चंद्रकांत बाबासो पाटील यांनी चक्क सीडलेस काकडी पिकवलीये.
advertisement
2/7
चंद्रकांत पाटील यांनी ढोलेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या 10 गुंठे शेतात पॉलिहाऊस भा केला आहे. याठिकाणी ते जरबेराची शेती करत होते. परंतु, यंदा त्यांनी सीडलेस काकडीच्या अधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
advertisement
3/7
पॉलिहाऊसमध्ये फेब्रुवारी महिन्यात त्यांनी सीडलेस काकडीची लागवड केली. यासाठी त्यांनी कृषी सल्लागार संतोष कोरे यांचे मार्गदर्शन घेतले. सीडलेस काकडीचे केयुके- 9 एस बियाणे वापरून त्यापासून त्यांनी दोन हजार रोपे तयार केली.
advertisement
4/7
पाटील यांनी बनवलेल्या 2 हजार रोपांची 15 दिवसानंतर पॉलिहाऊस मधील सरीवर लागवड केली. त्यानंतर तार व जाळी बांधून पीक संगोपन केले. तसेच काकडीचा प्लॉट पॉलिहाऊस मध्ये असल्याने रोग नियंत्रण व औषध फवारणीसाठी सोयीचे झाले.
advertisement
5/7
महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर काकडीचे उत्पादन सरू झाले. सुरुवातीच्या तोड्यांमध्ये त्यांना दररोज सरासरी 100 किलो काकडीचे उत्पादन मिळाले.
advertisement
6/7
सीडलेस काकडीला प्रति किलो 60 ते 70 रुपये भाव मिळत असून मुंबई मार्केटला मोठी मागणी आहे. अवघ्या दोन महिन्यात दहा गुंठे क्षेत्रातून अडीच टन काकडीचे उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च वजा जाता लाखावर नफा झाला. काकडीचे पीक व्यापारी तत्वावर घेतले आहे.
advertisement
7/7
या काकडीमध्ये अगदी कमी बिया असतात म्हणून याला 'सीडलेस काकडी' म्हणतात. योग्य संगोपणामुळे सीडलेस काकडीचा जिल्ह्यातील हा वेगळा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Agriculture Success: शेतकऱ्याचा नादच खुळा! 10 गुंठे शेती अन् 2 महिन्यात लखपती, पाहा काय केलं?