जया बच्चनचा जाच की अभिषेकसोबत भांडण? ऐश्वर्या सासर सोडून आईकडे का राहते, अखेर समोर आलं सत्य
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Aishwarya Rai : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या सर्वात चर्चित जोडप्याबद्दल एक अफवा वारंवार समोर येते आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नात सर्व काही ठीक नाही, इतकंच नव्हे तर दोघं घटस्फोट घेणार आहेत, अशा गप्पांना जोर मिळालेला.
advertisement
1/7

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडच्या सर्वात चर्चित जोडप्याबद्दल एक अफवा वारंवार समोर येते आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नात सर्व काही ठीक नाही, इतकंच नव्हे तर दोघं घटस्फोट घेणार आहेत, अशा गप्पांना जोर मिळालेला.
advertisement
2/7
काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये तर अभिषेकच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आल्याचंही लिहिलं गेलं. एवढंच नाही तर ऐश्वर्या बच्चन घर सोडून आईसोबत राहतेय, सासूसोबत पटत नाही, वहिनीसोबत मतभेद आहेत, असंही सांगितलं गेलं.
advertisement
3/7
परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्यासारखं वाटतंय. कारण सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी या संपूर्ण प्रकरणावर थेट भाष्य केलं आहे. प्रल्हाद कक्कर हे ऐश्वर्याला तिच्या मॉडेलिंगच्या काळापासून ओळखतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते ऐश्वर्याच्याच इमारतीत राहतात.
advertisement
4/7
एका मुलाखतीत कक्कर यांनी स्पष्ट सांगितलं, "अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोट होतो आहे ही गोष्ट पूर्णपणे बकवास आहे. यात अजिबात तथ्य नाही. लोक सोशल मीडियावर हवेतल्या गोष्टी रंगवत आहेत."
advertisement
5/7
ते पुढे म्हणाले, "ऐश्वर्या आईशी खूपच जवळ आहे. ती तिची काळजी घेते, तिच्यासोबत वेळ घालवते. त्यामुळे लोकांना वाटतं की ती आईकडेच जास्त असते आणि बच्चन घरात राहात नाही. पण खरं तसं अजिबात नाही. ती बच्चन घराची सून आहे आणि अजूनही तिथे घर व्यवस्थित सांभाळते."
advertisement
6/7
खरं तर, ऐश्वर्या राय बच्चन या कायमच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. बच्चन कुटुंबातील कार्यक्रम असो, मुलगी आराध्याचे शालेय समारंभ असो किंवा आईसोबत वेळ घालवणं असो, ऐश्वर्या या सर्व गोष्टींमध्ये सक्रियपणे सहभागी होत असते.
advertisement
7/7
घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक-ऐश्वर्या अधिकृतरित्या काहीही बोलले नसले तरी वेळोवेळी दोघे एकत्र स्पॉट झाले. त्यामुळे या अफवांचा जोर कमी झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जया बच्चनचा जाच की अभिषेकसोबत भांडण? ऐश्वर्या सासर सोडून आईकडे का राहते, अखेर समोर आलं सत्य