Sai Tamhankar : 'करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा...', बोल्ड सीन करण्याबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sai Tamhankar : सई ताम्हणकरने 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे' मधील बिकिनी सीन आणि 'हंटर' मधील किसिंग सीनबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं होतं.
advertisement
1/6

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत असते. तिने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचा ठसा उमटवला आहे.
advertisement
2/6
तिच्या 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे' या चित्रपटातील बिकिनी सीनने तेव्हा खूप खळबळ उडवून दिली होती. आता सईने एका मुलाखतीत त्या सीनबद्दल आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
advertisement
3/6
सईने काही महिन्यांपूर्वी 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिला तिच्या बिकिनी सीनबद्दल विचारण्यात आलं. यावर सई म्हणाली, “माझ्या जागी दुसरी कोणीही असती, तरी तिलासुद्धा लोकांनी स्वीकारलं असतं, जसं त्यांनी मला स्वीकारलं. हा सीन माझ्या चाहत्यांसाठी खूप धक्कादायक होता.”
advertisement
4/6
ती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी हे इतकं साधं होतं की, जर एखादी मुलगी स्विमिंग करत असेल, तर ती स्विमसूटमध्ये असणं साहजिक आहे. पण, लोकांसाठी तो एक बोल्ड सीन होता, माझ्यासाठी तो फक्त चित्रपटाचा एक भाग होता. पण, या मर्यादा ओलांडून पुढे जाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.”
advertisement
5/6
सईने 'हंटर' या हिंदी चित्रपटातही एक बोल्ड भूमिका केली होती, ज्यात तिचा किसिंग सीन खूप व्हायरल झाला होता. त्याबद्दल बोलताना सई म्हणाली, “जर तुम्ही असं विचाराल की, ‘लोक काय विचार करतील?’ तर मग अभिनेत्री बनायलाच नको होतं. तुम्हाला ते स्वीकारलं पाहिजे.”
advertisement
6/6
ती म्हणाली, “खरंतर, तो सीन चित्रपट शूट झाल्यानंतर एक वर्षानंतर शूट झाला होता. त्यामुळे मी त्याला बोल्ड म्हणून पाहत नाही, तो माझ्या कामाचा एक भाग होता.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sai Tamhankar : 'करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर मर्यादा...', बोल्ड सीन करण्याबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर