Success Story : पारंपरिक शेतीमध्ये झाला तोटा, कर्ज घेत केली टरबूज लागवड, आता 8 लाखांचा निव्वळ नफा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
अपयशावर पुन्हा मात करत शेतकरी शेती यशस्वी करतात. अशीच कहाणी बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चव्हाण या शेतकऱ्याची आहे.
advertisement
1/7

शेती करताना अनेकदा शेतकऱ्याच्या नशिबी अपयश येते. मात्र त्या अपयशावर पुन्हा मात करत शेतकरी शेती यशस्वी करतात. अशीच कहाणी बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चव्हाण या शेतकऱ्याची आहे.
advertisement
2/7
ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे फक्त दोन एकर जमीन आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात दीड एकरात कापूस आणि उर्वरित अर्ध्या एकरात सोयाबीन पिकवले होते. परंतु अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ही दोन्ही पिके पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नष्ट झाली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.
advertisement
3/7
हे नुकसान झाल्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या पुढे काय करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. तरीही खचून न जाता त्यांनी नव्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि हिवाळी हंगामात टरबूजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी टरबूज लागवडीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते, तरीदेखील अनुभवाच्या जोरावर टरबूज लागवड केली.
advertisement
4/7
अवकाळी पावसाने शेतीमध्ये नुकसान झाल्यामुळे त्यांनी सावकाराकडून सुमारे दीड लाख रुपये उसने घेतले. टरबूज लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाख दहा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. नियोजनबद्ध पद्धतीने पाणी, खत व्यवस्थापन आणि पिकाची निगा राखत त्यांनी मेहनत सुरू ठेवली.
advertisement
5/7
त्यांना कष्ट आणि चिकाटीचे फळ भरभरून मिळाले. यावर्षी टरबूजाला सुरुवातीला दर चांगले राहिले. त्यामुळे त्यांनी एका हंगामातच सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळवत कर्जाची परतफेड केली आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्याची दिशा मिळवली.
advertisement
6/7
संकटं येतातच, पण त्यांना घाबरून न जाता धैर्याने पुढे जाणे गरजेचे आहे, असे ज्ञानेश्वर चव्हाण सांगतात. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नव्या पिकांचा विचार करण्याची प्रेरणा मिळत आहे.
advertisement
7/7
कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीमध्ये झाला तोटा, कर्ज घेत केली टरबूज लागवड, आता 8 लाखांचा निव्वळ नफा