सौर कृषी पंप बिघडलाय का? मग आता ऑनलाइन पद्धतीने करा तक्रार, ते कसं? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
advertisement
1/5

शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सौर पंप बसवण्यात होणारा विलंब, पंप सुरू झाल्यानंतर येणारे तांत्रिक बिघाड, दुरुस्ती किंवा देखभाल यासंबंधीच्या तक्रारींसाठी आता शेतकऱ्यांना कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या, एका क्लिकवर तक्रार नोंदवून तिचे निवारण करून घेण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
2/5
महावितरणने यासाठी स्वतंत्र आणि सुलभ असे ‘तक्रार निवारण पोर्टल’ विकसित केले असून, या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याबरोबरच त्या तक्रारीची सद्यस्थिती तपासण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तक्रार कुठल्या टप्प्यावर आहे, ती कधी निकाली निघणार आहे, याचा थेट मागोवा घेता येणार आहे. या उपक्रमामुळे सौर कृषी पंप योजनेतील पारदर्शकता वाढण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
advertisement
3/5
तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in वर भेट द्यायची आहे. संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ असा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तक्रार नोंदवण्याचा पर्याय दिसेल. येथे शेतकरी आपला लाभार्थी क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव आणि लाभार्थ्याचे नाव टाकून स्वतःची माहिती शोधू शकतात.
advertisement
4/5
माहिती पडताळणीनंतर शेतकरी आपली अडचण सविस्तर स्वरूपात नोंदवू शकतात. पंप बसवण्यात होणारा विलंब, सौर पॅनल किंवा मोटरमधील बिघाड, वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या, देखभाल न झाल्याबाबतच्या तक्रारी अशा विविध बाबींचा समावेश तक्रारीत करता येणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर एक संदर्भ क्रमांक दिला जाणार असून, त्याच्या आधारे पुढील काळात तक्रारीची प्रगती याच पोर्टलवर पाहता येईल.
advertisement
5/5
महावितरणकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवा किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. सौर कृषी पंप योजनेशी संबंधित सर्व अधिकृत माहिती, तक्रार नोंदणी आणि निवारणाची प्रक्रिया ही केवळ महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावी. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि शेतकऱ्यांना योग्य व वेळेत सेवा मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सौर कृषी पंप बिघडलाय का? मग आता ऑनलाइन पद्धतीने करा तक्रार, ते कसं? A TO Z माहिती