Rinku Rajguru : 'ट्राय करू, 4 महिने राहून बघू...', Gen Z असलेली रिंकू राजगुरू लिव्ह-इन रिलेशनबाबत स्पष्टच बोलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru : सध्या जेन झीच्या जमान्यातील मॉर्डन रिलेशनशिपबाबत अनेक टर्म्स ऐकायला मिळतात. अभिनेत्री रिंकू राजगुरूनं याबाबत तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
advertisement
1/9

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. सैराटमध्ये रिंकूने साकारलेली आर्ची आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रिंकू म्हणजे आर्ची आणि आर्ची म्हणजे रिंकू हे समीकरण फिक्स झालं आहे.
advertisement
2/9
कलाकार म्हटलं की चाहत्यांना त्याच्या ऑनस्क्रिन आयुष्याबरोबर ऑफस्क्रिन आयुष्यातही तितकाच रस असतो. कलाकारांच्या आयुष्याता काय सुरू आहे? त्यांची लव्ह लाईफ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
advertisement
3/9
कलाकारांची लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीतही असं अनेकदा घडलं. रिंकूचं नाव अनेकदा सैराटचा परशा म्हणजे अभिनेता आकाश ठोसरशी जोडण्यात आलं होतं.
advertisement
4/9
त्याचबरोबर तिचा कृष्णराज महाडिकसोबतचा फोटो देखील व्हायरल झाला होता. पण रिंकूने कधीच या चर्चांना दुजोरा दिला नाही.
advertisement
5/9
दरम्यान रिंकू राजगुरू आता लग्न कधी करणार असा प्रश्न तिला सातत्यानं विचारण्यात येतो. रिंकू देखील त्यावर खुलेपणानं बोलते. रिंकू ही आताची जेन झी पिढीतील मुलगी आहे. ती जेन झीच्या पिढीतील असली तरी तिचे विचार मात्र जेन झींसारखे नाहीत. सध्याच्या मॉडर्न युगात रिंकू थोडी वेगळी आहे.
advertisement
6/9
जेन झींसोबत त्यांची मॉडर्न डेटिंगही अनेकांनी स्वीकारली आहे. पण रिंकूला मात्र हे अजिबात आवडत नाही. लिव्ह -इन रिलेशन आणि मॉर्डन डेटिंगवर रिंकूने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
advertisement
7/9
लोकमत फिल्मीशी बोलताना रिंकू म्हणाली, "मला हे वैयक्तिकरित्या आवडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही माणसाला त्या नात्यात घेता, तेव्हा ट्राय करू आणि चार महिने राहून बघू असं नाही करू शकत. कारण आपण त्या माणसामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत असतो."
advertisement
8/9
रिंकू पुढे म्हणाली, "माझं असं मत आहे की तुम्ही जर त्या माणसाची आयुष्यभरासाठी जबाबदारी घेणार असाल तरच त्या माणसाकडे जा. तुमची जर ती क्षमता नसेल तर त्यात तुम्ही पडू नका. सुरूवातीपासूनच सगळ्या गोष्टींबाबत स्पष्ट रहा."
advertisement
9/9
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास रिंकूचा आशा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात रिंकूनं आशा सेविकांची भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी रिंकूना राज्य शासनाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'ट्राय करू, 4 महिने राहून बघू...', Gen Z असलेली रिंकू राजगुरू लिव्ह-इन रिलेशनबाबत स्पष्टच बोलली