लक्षात आहे का ऐश्वर्याने 'हम दिल दे चुके सनम'मध्ये घेतलेली ही काळी शाल; होती खूप खास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hum Dil De Chuke Sanam : 'हम दिल दे चुके सनम'मधील ऐश्वर्या रायने लाल साडीवर घेतलेली ही काळी शाल साधी नाही. तर यामध्ये खास अर्थ दडलेला आहे.
advertisement
1/7

1999 साली प्रदर्शित झालेली हम दिल चुके फिल्म तुम्ही पाहिली असेलच. एक लव्ह स्टोरी, ज्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिनेता सलमान खान आणि अभिनेता अजय देवगण आहे.
advertisement
2/7
या फिल्मध्ये तुम्ही शेवटच्या सीन्समध्ये ऐश्वर्याचा लूक पाहिला असेल तर लाल रंगाची साडी आणि त्यावर काळ्या रंगाची शाल असा हा लूक.
advertisement
3/7
सामान्यपणे ऐश्वर्याच्या अंगावरील ही शाल एक साडीवर थंडीचा लूक म्हणून तुम्ही त्याकडे पाहिलं असेल. पण शाल जितकी दिसते तितकी साधी नाही. ती खूप खास आहेत. त्यात मोठा अर्थ दडला आहे.
advertisement
4/7
तुम्ही पाहाल तर ऐश्वर्याची लाल रंगाची साडी म्हणजे प्रेमाचा रंग, तिथंच अजय देवगणनं संपूर्ण पांढऱ्या रंगाचं शर्ट, पँट आणि कोट घातला आहे, जो प्युर हार्ट दर्शवतो. त्यात ही काळी शाल म्हणजे थोडं विचित्र कॉम्बिनेशन वाटेल.
advertisement
5/7
पण जेव्हा या लूकमध्ये नंदिनी म्हणून ऐश्वर्या समीर म्हणजे सलमानला भेटते. तेव्हा सलमान संपूर्ण काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतो. नंदिनीची काळी शाल आणि सलमानचा काळा ड्रेस त्या दोघांचा भूतकाळातील संबंध दर्शवतो.
advertisement
6/7
शेवटी नंदिनी जेव्हा वनराज म्हणजे अजय देवगणकडे ब्रीजवरून धावत जाते. तेव्हा तिच्या अंगावरील ही काळी शाल खाली पडलेली दाखवेली आहे. याचा अर्थ तिने भूतकाळ मागे सोडला आहे.
advertisement
7/7
शेवटी नंदिनी आणि वनराज यांची भेट, त्यांनी एकमेकांचा धरलेला हात म्हणजे त्यांच्यातील प्युर लव्ह म्हणजे खऱ्या प्रेमाचं विजय झाल्याचं हे प्रतीक.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लक्षात आहे का ऐश्वर्याने 'हम दिल दे चुके सनम'मध्ये घेतलेली ही काळी शाल; होती खूप खास